मिरचीवर विषाणूजन्य आजाराची लागण
By admin | Published: December 31, 2014 11:30 PM2014-12-31T23:30:01+5:302014-12-31T23:30:01+5:30
निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील
गिरड : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात मिरचीची लागवड केली. मात्र त्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठे नुकसान होत आहे.
खरीप हंगामातील पीक हातचे गेल्यानंतर रबीतील भाजीपाला उत्पादनावर वातावरणाच्या बदलाने किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी मिरची पिकांवर विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
बदलत्या वातावरणामुळे खरिपातील शेतपिकांनी शेतकऱ्यांना दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीच्या सततच्या हवामान बदलामुळे खरिपातील शेतपिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याने शेतकरी कायमच वैतागला आहे. शेतपिकावर केलेला उत्पादन खर्च निघणे जिकरीचे झाले असताना रबी हंगामात ढगाळी वातावरणामुळे भाजीपाला पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मिरची पिकाला विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हैराण आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर अली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांना नाइलाजास्तव भाजीपाला पीक लागवडीतून मिरची पिकाला हद्दपार करावे लागत आहे. एका बाजूला वाळल्या मिरचीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. शिवाय भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांच्या महागड्या औषधांच्या फवारणीवर बराच खर्च केला आहे. मिरची पिकाला वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी केलेला खर्च निष्फळ ठरला आहे. जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी काही प्रमाणात मिरचीची लागवड करतात.
लगतच्या नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, उमरेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात; मात्र यावर्षी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने मिरचीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. या भागातील मिरची उत्पादनावर विदर्भातील बाजारपेठ अवलंबून आहे. मात्र उत्पादन घटल्याने भावात तेजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मिरचीच्या उत्पादनावर केलेला खर्च यंदा व्यर्थ ठरला आहे. कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.(वार्ताहर)