पोळ्यावर महागाईचे सावट

By admin | Published: August 29, 2016 12:33 AM2016-08-29T00:33:07+5:302016-08-29T00:33:07+5:30

शेतकऱ्यांचा सण पोळा काही दिवसांवर आला आहे. या पोळ्यावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची झळ असल्याचे दिसत आहे.

Inflation on the hive | पोळ्यावर महागाईचे सावट

पोळ्यावर महागाईचे सावट

Next

शेतकरी चिंतेत : बैलांची संख्या घटतीवर
आर्वी : शेतकऱ्यांचा सण पोळा काही दिवसांवर आला आहे. या पोळ्यावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची झळ असल्याचे दिसत आहे. या स्थितीमुळे बाजारात असलेल्या साहित्य खरेदीकडे सध्या दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. साहित्याला महागाईची झळ बसल्याने शेतकऱ्यांना ते असह्य होत आहे. यामुळे त्याने बाजाराकडे पाठ केल्याचे दिसत आहे.
सणाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. या पावसामुळे पिकांचा पाचोळा होण्याची वेळ आली आहे. जर एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होण्याची चिन्हे आहेत. याच दिवसात पोळा सण आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.
वर्षभर शेतात इमानेइतबारे कबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा पोळा हा सण बळीराज नेहमीच आगळावेगळा आणि उत्साहाने साजरा करतो. त्याचे ऋण फेडण्याचा एक प्रयत्न त्याच्याकडून होतो. सध्या निसर्गाकडून होत असलेली अवकृपा, चाऱ्याचा भेडसावणारा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्री करणे सुरू केले आहे. परिणामी बैलांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.


बैलांचा साज आसमानाला
रंगबेरंगी कासरे, १०० रुपये पर्यंत तर देखणी गोडे ५० रुपये, बाशींग जोडी १०० रुपये, वेसन ७५ रुपये, गोडे झुल्याचे १५० रुपये, तोडे घुंगरे ५०० रुपये जोडी, कापडी माळ २५० रुपये, मठाटी १०० रुपये, जोडी तर बासींग फुल १०० रुपये जोडी, जिलेटींग पेपर गेरू, आॅईल पेन्ट आदी शेतकऱ्यांच्या उपयोगी असलेल्या वस्तूंचे भाव दामदुप्पट झाल्याने शेतकऱ्यांचा पोळा सण महागाईच्या विळख्यात सापडला आहे.
आपला बैल जोडीच्या भरोश्यावर बाराही महिने राबराब राबून त्याच्या भरोश्यावर शेती पिकवून साऱ्यांच्या पोटाला अन्न देणाऱ्या बळीराजाचे त्याच्या बैलावर जीवापाड प्रेम असते. यामुळे त्याच्या साजात बळीराजाकडून कसर होत नाही. अशा स्थितीतही पोळा सण साजरा करण्याकरिता शेतकरी मागे येत नाही.

Web Title: Inflation on the hive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.