आरोग्य विभागाचे सूचना फलक वर्षभरापासून कोरे

By Admin | Published: November 19, 2016 01:14 AM2016-11-19T01:14:23+5:302016-11-19T01:14:23+5:30

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थळी सूचना फलक तयार केले.

Information about health department from year to year | आरोग्य विभागाचे सूचना फलक वर्षभरापासून कोरे

आरोग्य विभागाचे सूचना फलक वर्षभरापासून कोरे

googlenewsNext

विभागाचे दुर्लक्ष : लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ
कारंजा (घा.) : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थळी सूचना फलक तयार केले. कारंजा तालुक्यात याप्रकाराचे १०० हून अधिक फलक मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आले. याकरिता लाखो रुपयांचा खर्च झाला. मात्र हे फलक रिकामे राहत असल्याने योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे.
आरोग्य केंद्राच्या तसेच मोक्याच्यास्थळी भिंतीवर सूचना फलक तयार केले. यासाठी शासनाचे लाखो रूपये खर्च झालेत. परंतु तालुक्यातील एकाही फलकावर आरोग्य विषयक सूचना लिहलेली आढळत नाही. यावरून आरोग्य विभाग आपल्या कर्तव्याबद्दल किती दक्ष आहे हेच लक्षात येते. हे रिकामे फलक कुणाला सूचना देतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या भिंती रंगविण्यासाठी शासनाने लाखो रूपये खर्च केले आहेत. पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यावर सूचना लिहण्याची तसदी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे उपचारासंबंधी किंवा जनजागृती संदर्भात येथे संदेश वाचायला मिळत नाही. त्यामुळे हा खर्च वाया गेला असल्याचे दिसते. या सूचना फलकाची निर्मिती कशाकरिता याविषयी रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

आरोग्य संरक्षक भिंती सूचनांच्या प्रतीक्षेत
कारंजा येथील आरोग्य संरक्षक भिंतीवर सूचना फलक तयार केला आहे. आरोग्य संदेशाची एक वर्षापासून वाट पाहात उभी आहे. शासनाच्या आरोग्यविषयक योजना आणि कार्यक्रमांची माहिती तालुक्यातील जनतेला व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हाती घेतला. आरोग्य विभागातर्फे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मोक्याचे ठिकाणी भिंतीवर आरोग्य संरक्षण भिंत यात सूचना फलक तयार केले. या फलकावर आरोग्य संदेश लिहावा आणि आरोग्याबद्दल जनजागृती करूण शासकीय योजना ग्रामस्थांत पोहचाव्यात असा शासनाचा उद्देश आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Information about health department from year to year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.