सदैव सत्तेसोबत राहणारे इंझाळा सर्कल
By admin | Published: December 30, 2016 12:43 AM2016-12-30T00:43:07+5:302016-12-30T00:43:07+5:30
मिनी मंत्रालय जि.प. निवणुकांचे सर्वांना वेध लागले आहे. फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या
२० गावांचा समावेश : सभापती पदाचा मान
नाचणगाव : मिनी मंत्रालय जि.प. निवणुकांचे सर्वांना वेध लागले आहे. फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहे. सध्या विविध जि.प. सर्कलचाही आढावा घेतला जात आहे. सदैव सत्तेसोबत राहणारे सर्कल म्हणून ओळख असलेल्या इंझाळामध्ये यंदा काँग्रेस, राकाँ, बसपाचा कस लागणार असल्याचे बोलले जात आहे.
इंझाळा जि.प. सर्कल देवळी तालुक्यात भौगोलिक रचनेनुसार मोठे आहे. २० च्या वर गावांचा या जि.प. क्षेत्रात समावेश आहे. नाचणगाव जि.प. क्षेत्रातील गावांचा समावेश नव्याने यात करण्यात आला आहे. २० वर्षांत डॉ. प्रदीप धांदे, देविदास तिनघसे, जनुबाई आटे, विष्णू ताडाम व किशोर मडावी हे पाच जि.प. सदस्य या सर्कलला लाभले. यात तिनघसे यांनी या क्षेत्राच्या भरवशावर जि.प. सभापतीपद मिळविले; पण सत्तेतील चढउतारानुसार मतदारांनी हे क्षेत्र सत्तेसोबतच ठेवल्याचा इतिहास आहे. अनु. जाती, जमाती, इमाव असा आरक्षणाचा प्रवास यावेळी इतर मागासवर्गीय महिला उमेदवारावर येऊन ठेपला आहे. या जि.प. क्षेत्रात इंझाळा व सोनोरा पं.स. गणांचा समावेश आहे. इंझाळा सर्वसाधारण तर सोनोरा गण इतर मागासवर्गीय महिला राखीव आहे.
जि.प. गटासाठी यावेळी ज्योती युवराज खडतकर, शुभांगी ढुमणे, निला खेडकर, लिना भानखेडे, अर्चना संजय गावंडे, कल्याणी विकास ढोक, तर सोनोरा पं.स. गणासाठी जया सुधीर महाजन, प्रणिता समीर ढोक, तिनघसे आणि इंझाळा गणासाठी किशोर मडावी, प्रमोद बिरे, भानखडे ही नावे चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.(वार्ताहर)