जमीन संपादनाच्या मोबदल्यात अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:47 PM2018-11-03T21:47:49+5:302018-11-03T21:48:41+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा दर मोबदल्याच्या स्वरूपात हेक्टर आर प्रमाणे देण्यात आलेला आहे; पण याच प्रकल्पासाठी संपूर्ण यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांना नॅशनल हायवेज अॅक्ट १९५६ च्या तरतुदीनुसार चौरस मिटर व त्यावरील चार गुणक प्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी व भूमिपुत्र संघर्ष वाहिनेने जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका (भूसंपादन मामला क्र. ६/४७/२०१५-१६) येथील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा सादर केला आहे. वर्धा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शिवाय सध्या शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शेती संपादीत करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे रोजगाराचे साधन हिरावले जाणार आहे. त्यांना मिळालेला मोबदला पुढील आयुष्य जगण्यासाठी व निर्वाहासाठी आधार आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या या विषयाकडे लक्ष घालून वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादीत होणाऱ्या जमिनीचा दर चौरस मिटर व त्यावरील चारचा गुणक प्रमाणे लावून मोबदला देण्यात यावा. अन्यथा भूमिपुत्र संघर्ष वाहिनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करेल, असा इशारा संघर्ष वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांनी दिला आहे. सोमवारी या शेतकºयांना घेवून भूमिपुत्र संघर्ष वाहिनी विभागीय आयुक्त नागपूर यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. याप्रसंगी योगेश घोगरे, प्रवीण पेठे, रितेश घोगरे, प्रवीण काटकर, राम डायगव्हाणे, शेतकरी उदय देशमुख, संजय मेहत्रे, अविनाश कुबडे, कुणाल देशमुख, निलेश वाघ, धनंजय चरडे, नरेंद्र वघळे, प्रताप चरडे, जाहीद खाँ पठाण, मुशीर पठाण, दत्तात्रय चरडे, सतीश देशमुख, रामानंद नागतोडे, जगदीश बदरीया, किशोर मडावी, गणेश वघळे, लक्ष्मण बदरिया, दत्तात्रय राऊत, अरविंद देशमुख, विलास मेहत्रे, रत्नाकर चरडे, विनोद फटींग, रवी रूईकर, मनोहर हजारे आदींची उपस्थिती होती.