पुलगावच्या तहसील कार्यालयाची चौकशी

By admin | Published: July 12, 2017 02:11 AM2017-07-12T02:11:46+5:302017-07-12T02:11:46+5:30

पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालय शोभेचे ठरत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच

Inquiry of Tehsil office of Pulgaon | पुलगावच्या तहसील कार्यालयाची चौकशी

पुलगावच्या तहसील कार्यालयाची चौकशी

Next

 वृत्ताची दखल : सेतू केंद्रासह नागरिकांचे नोंदविले बयाण, नायब तहसीलदार गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालय शोभेचे ठरत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत मंगळवारी पथक पाठवून तपासणी केली. यावेळी सेलू केंद्रातील संगणक चालक तथा दोन नागरिकांचे बयाण नोंदविण्यात आले. चौकशी पथक दाखल झाले असतानाही नायब तहसीलदार राठोड गैरहजरच होते, हे विशेष!
पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयात कुठलीही कामे होत नसल्याने ते बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय व महाआॅनलाईनच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत पाहणी केली. मंगळवारी देवळी, पुलगाव व वर्धा येथील सेतू केंद्रांची तथा पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी ३३ रुपये शासकीय किंमत असताना कुठे ५०, कुठे १५० तर कुठे त्यापेक्षाही जास्त रक्कम आकारली जात असल्याचे आढळून आले. याबाबत पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्राचे संगणक चालक कपील शेंडे यांचे बयाण नोंदविण्यात आले. यात केंद्र संचालकाने सांगितल्याप्रमाणे आकारणी केली जात असल्याचे त्याने सांगितले. सदर केंद्र स्मिता भुसारी व नितेश रावेकर यांच्या नावावर आहे. शिवाय दोन नागरिकांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यांनी ३३ रुपयांऐवजी ५० व १५० रुपयांची मागणी केली जात असल्याचे नमूद केले. हे बयाण पथकाने देवळीचे नायब तहसीलदार वरपे यांच्याकडे सोपविले आहे. पथकाद्वारे चौकशी सुरू असताना पुलगाव येथील नायब तहसीलदार राठोड हे गैरहजर होते. यामुळे पुलगाव नायब तहसीलदार कार्यालयातील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
तपासणी पथकामध्ये परिविक्षाधिन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक कदम, अतूल रासपायले, संजय मानेकर, वरपे व महाआॅनलाईनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. देवळी, पुलगाव तहसील कार्यालयातील ग्रामदूत सेवा व विविधा केंद्रात गैरप्रकार आढळल्याने कार्यवाही होणार असल्याचे पथकाद्वारे सांगण्यात आले.

‘त्या’ खांबांवर काँक्रीटचा मुलामा
रस्त्याच्या रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. यातील बॅचलर रोडवर आर्वी नाका चौकात असलेले विद्युत खांब महावितरण कापून काढले. यात रस्त्यावर अनकुचिदार लोखंड राहिले होते. यामुळे वाहने पंक्चर होत होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत महावितरणने त्या अणकुचिदार लोखंडाला सिमेंट काँक्रीटचा मुलामा दिला आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला.

Web Title: Inquiry of Tehsil office of Pulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.