जंतनाशक दिन मोहिम प्रारंभ

By Admin | Published: February 11, 2017 12:42 AM2017-02-11T00:42:06+5:302017-02-11T00:42:06+5:30

जंतामुळे विद्यार्थ्यांना रक्तक्षय होतो. शिवाय या आजाराचे प्रमाण कियोरवयीन मुलांमध्ये अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Insecticide Day Campaign Start | जंतनाशक दिन मोहिम प्रारंभ

जंतनाशक दिन मोहिम प्रारंभ

googlenewsNext

केसरीमल कन्या शाळेत विद्यार्थ्यांना अतिथींनी दिल्या गोळ्या
वर्धा : जंतामुळे विद्यार्थ्यांना रक्तक्षय होतो. शिवाय या आजाराचे प्रमाण कियोरवयीन मुलांमध्ये अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यात किशोरवयींन मुलींचे प्रमाण अधिक असल्याने या जंतांचा नाश करण्याकरिता शासनाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा वर्धा जिल्ह्यात केसरीमल कन्या शाळेतून शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला.
मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, बालकल्याण व महिला विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडे, उपशिक्षणाणिकारी एस.आर. मेश्राम अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांची उपस्थिती होती. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोठ्या देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के (१४१ दशलक्ष) मुले असून त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतांपासून धोका आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आली.
यावेळी उपस्थित अतिथींनी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापासून बचाव करण्याकरिता गोळ्या घेण्यासोबतच काय उपाययोजना राबविण्याची गरज आहे, याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने यावेळी देण्यात आली.
यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश रेवतकर, केसरीमल कन्या शाळेच्या प्राचार्य लांजेवार, साथरोग तज्ज्ञ डॉ. विनित झलके, यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

Web Title: Insecticide Day Campaign Start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.