अधीक्षक अभियंत्यांकडून निकृष्ट कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 10:34 PM2018-06-07T22:34:46+5:302018-06-07T22:34:46+5:30
तालुक्यातील अंबिकापूर पुनर्वसनात विविध विकास कामे होत आहे. त्यामुळे या भागाचा चेहरा बदलणार असून सुरू असलेल्या कामाची पाहणी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंत्यांनी केली. येथील कामात गैरप्रकार होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील अंबिकापूर पुनर्वसनात विविध विकास कामे होत आहे. त्यामुळे या भागाचा चेहरा बदलणार असून सुरू असलेल्या कामाची पाहणी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंत्यांनी केली. येथील कामात गैरप्रकार होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
मौजा अंबिकापूर येथे १८ नागरी सुविधेचा भाग म्हणून नाल्याचे बांधकाम करण्यात आले. सदर कामात रेतीचा वापर न करता मोठ्या प्रमाणात डस्ट वापरल्या गेली. तसेच लोहा व गिट्टीचा वापर प्राकलनानुसार केला नाही. परीणामी कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार करण्यात आली होती. काही नाल्यांना उतार नसल्याची ओरड होती. तयार करण्यात आलेल्या पक्क्या नाल्यांची गुणवत्ताही पाहिजे तशी नसल्याचे तक्रारीत नमुद होते. हिच परिस्थिती निम्म वर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधीत पुनर्वसीत गावांमध्ये आहे. एकंदरीत या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ग्रा.पं. इमार बांधकामातही मनमर्जीच करण्यात आली. याबाबतची तक्रार प्राप्त होताच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंत्यांनी प्रत्यक्ष गाव गाठून पाहणी केली. अधीक्षक अभियंत्यांनी स्थानिक अभियंत्यांची कानउघाडणीच केली. आता कुठली कार्यवाही होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.