पुरवठा अधिकाºयाकडून गोजीच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:36 PM2017-11-14T22:36:14+5:302017-11-14T22:36:27+5:30

शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतील धान्याचा पुरवठा करण्याकरिता असलेल्या गोजी येथील स्वस्त धान्य दुकानाचा मालक धान्याचा काळा बाजार करीत असल्याचे समोर आले.

Inspection of Goji cheaper food from the supply officer | पुरवठा अधिकाºयाकडून गोजीच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी

पुरवठा अधिकाºयाकडून गोजीच्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देधान्य वितरणात आढळल्या अनियमितता : परवाना रद्द करण्याची मागणी ं

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतील धान्याचा पुरवठा करण्याकरिता असलेल्या गोजी येथील स्वस्त धान्य दुकानाचा मालक धान्याचा काळा बाजार करीत असल्याचे समोर आले. मंगळवारी जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी दुकानाला भेट दिली असता तेथे कमालीची अनियमितता दिसून आली. यावरून सदर दुकान मालकाला येत्या शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) रोजी जिल्हा पुरवठा कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
गोजी येथे मारोती दादाजी ओंकार याच्याकडे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्यात आला आहे. या दुकानातून गरजूंना धान्य वितरित करण्याऐवजी त्याच्याकडून धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड होत होती. मागील दोन महिन्यांपासून गावातील लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही. एपीएल, बीपीएल धारक तथा शेतकºयांना सातबाºयावर मिळत असलेले धान्य प्रत्येक वेळी काही अडचणी पाहून ग्राहकाची दिशाभूल करून धान्य देत नाही. उर्वरित धान्य बाजारात नेऊन विकतो. या दुकान मालकाबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालयात तक्रारी केल्यात; पण त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. याबाबत ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा अधीक्षक अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आली. यानंतर १३ नोव्हेंबरला तहसीलदार तोडसाम यांनी गोजी गाव गाठले. यावेळी ओंकारचे स्वस्त धान्य दुकान बंद होते आणि तो देखील घरी नव्हता. दुकानाच्या फलकावर सोमवारी दुकान बंद राहील, असे लिहीले होते. यामुळे तोडसाम यांनी ‘मी उद्याला येऊन दुकानाला सिल लावेल आणि तक्रार करणाºया ग्राहकाचे बयाण घेऊन कार्यवाही करू’ असे सांगितले. या आश्वासनानुसार सर्वच गावकरी ग्रा.पं. कार्यालयात हजर झाले. दुपार झाली; पण कोणताही अधिकारी आला नाही.
परिणामी, ग्रामस्थांनी थेट जिल्हा पुरवठा अधिकाºयांचे कार्यालय गाठले. यावर जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी गाव गाठत दुकानाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे दिसून आले. यावरून जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी पत्र काढून तहसील कार्यालयात रवाना केले. सदर पत्र या दुकानमालकाला देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी गावाकºयांनी सदर दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा. ग्रामपंचायतच्या शॉपींग कॉम्प्लेक्सच्या खोलीतून धान्य विकण्यात यावे. यामुळे धान्याची अफरातफर होणार नाही. हे कंट्रोल दुसºया कोणत्याही नागरिकाला नियमानुसार देण्यात यावे, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली.
पुरवठा अधिकाºयांना निवेदन देताना मिलिंद भेंडे, अवतार ढगे, आशिया पठाण, रमला मसराम, गोविंद देवतळे, राजेंद्र वरघणे, संतोष जांभुळे, संभाजी पेटकर, पांडुरंग साखरकर, ज्ञानेश्वर राऊत, संजय निकुड, निखील मरस्कोल्हे, हेमंत खांडणेकर, आकाश बावणे, भारत महाजन, राहुल मरस्कोल्हे आदी उपस्थित होते.

Web Title: Inspection of Goji cheaper food from the supply officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.