पालिकेकडून पीओपी मूर्र्तींची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:38 PM2017-08-21T23:38:41+5:302017-08-21T23:39:07+5:30

न्यायालयाच्या बंदीनंतरही बाजारपेठेत गणेशोत्सवादरम्यान पीओपीच्या मूर्तींची विक्री होते.

Inspection of POP seizures from the corporation | पालिकेकडून पीओपी मूर्र्तींची तपासणी

पालिकेकडून पीओपी मूर्र्तींची तपासणी

Next
ठळक मुद्देअनेकांकडून घेतले लेखी आश्वासन : २० विक्रेत्यांना २४ तासांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : न्यायालयाच्या बंदीनंतरही बाजारपेठेत गणेशोत्सवादरम्यान पीओपीच्या मूर्तींची विक्री होते. दहा दिवसानंतर विसर्जनातून मोठ्या जल प्रदूषणात होते. हा प्रकार टाळण्याकरिता वर्धा पालिकेच्यावतीने पीओपी मूर्ती विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. सोमवारी वर्धा पालिकेच्या पथकाने बाजारपेठेतील पीओपींची मूर्ती विक्री करणाºयांना सूचना देत त्याच्याकडून तशा मूर्ती विकणार नसल्याचे लिहून घेतले. शिवाय २० जणांना मूर्तीची विल्हेवाट लावण्याकरिता २४ तासांचा कालावधी दिल्याची माहिती देण्यात आली.
प्लास्टर आॅफ पॅरीसची मूर्ती विरघळत नाही. त्यामुळे जल प्रदूषणात वाढ होते. यामुळे पीओपींच्या मूर्ती विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आल्या आहे. असे असतानाही गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेत पीओपींच्या मूर्तीची विक्री सुरू आहेत. पीओपी मूर्ती विक्री बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असल्याने वर्धा न.प.च्या अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी बाजारापेठे गाठली. यावेळी पालिकेकडून २० पीओपी मूर्ती विक्रेत्यांना सुचना देत पीओपीच्या मूर्ती स्वत:च हटविण्याकरिता २४ तासांची मुदत दिली.
या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास १० हजारांचा दंड व न.प.प्रशासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईला मूर्ती विक्रेता स्वत: जबाबदार राहील असे लेखी घेतले. पालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या विशेष पथकात प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, न.प. अभियंता सुधीर फरसोले, जगताप, मनीष मानकर, निखिल लोहवे, विजय कल्पे, योगेश नरपाडे, लिलाधर वैद्य, निखील कहाते, पेटकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

शहराच्या सौंदर्यीकरणासह प्रदूषणमुक्तीचा प्रयत्न सुरू आहे. याच प्रकारातून पीओपी मूर्ती विकणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा

Web Title: Inspection of POP seizures from the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.