केंद्रीय मंत्र्यांकडून तामसवाडा नाल्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:20 PM2018-02-14T22:20:53+5:302018-02-14T22:21:16+5:30
केंद्रीय राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल यांनी पूर्ती सिंचन संस्थेने नाला खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी खा. रामदास तडस, सुधीर दिवे, तहसीलदार एम.ए. सोनोने, माधव कोटस्थाने आदी उपस्थित होते.
ऑनलाईन लोकमत
आकोली : केंद्रीय राज्यमंत्री अर्जूनराम मेघवाल यांनी पूर्ती सिंचन संस्थेने नाला खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी खा. रामदास तडस, सुधीर दिवे, तहसीलदार एम.ए. सोनोने, माधव कोटस्थाने आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी जामणी साखर कारखान्यालाही भेट देत पाहणी केली.
पूर्ती सिंचन सहकारी संस्थेने तामसवाडा येथील जंगलातून उगम पावणाऱ्या नदीचे सरळीकरण व खोलीकरण केले. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मेघवाल आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रमोद राऊत या शेतकऱ्याच्या शेतात नदीतील दगड व माती पुराने वाहून येत विहीर बुजली. यामुळे शेतकऱ्यावर संकट कोसळले. शेतकरी राऊत हा अपंग आहे, हे विशेष! मेघवाल यांनी कैफियत ऐकून घेतली. शेतकऱ्याला खा. तडस यांना माहिती दिली नाही का, असा प्रतिप्रश्नही केला. गावातील महिलांनी रस्त्याची समस्या मांडली. सिंचन प्रकल्पामुळे शेताचे रस्ते बंद झाले असून अनेक ठिकाणी पूल करावे लागतात; पण दुर्लक्ष होत असल्याने कापसाचे गाठोडे डोक्यावर आणावे लागतात. खते व अन्य शेती साहित्य डोक्यावर न्यावे लागत असल्याचे सांगितले. मेघवाल यांनी विहिरीची पाणी पातळी पाहिली. नदीची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केली व प्रकल्पामुळे झालेले फायदे, तोटे ग्रामस्थांकडून जाणून घेतलेत.