गांधीजींचे कार्य कृतीशील व स्वत:पासून असणे प्रेरणादायी
By admin | Published: September 9, 2016 02:22 AM2016-09-09T02:22:15+5:302016-09-09T02:22:15+5:30
गांधीजी विषयी वाचून समजणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत राहून अनुभवणे या दोन बाबी वेगळ्या आहेत.
रफीउल्लाह : नई तालीम समिती परिसरातील शांती भवन अध्ययन
सेवाग्राम : गांधीजी विषयी वाचून समजणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत राहून अनुभवणे या दोन बाबी वेगळ्या आहेत. गांधीजी काय आहे हे त्यांच्या वास्तव्यातील भूमीत कळले. प्रार्थना सर्व धर्मात होते. पण या ठिकाणी मोकळ्या जागेत सर्व धर्माची प्रार्थना हा एक वेगळा अनुभव आला. गांधीजींनी सर्व धर्मांचा आदर सांगितला असला तरी ते प्रत्यक्ष जगले. त्यांचे कार्यच मुळात कृतीशील आणि स्वत:पासून होते. अहिंसेची शिकवण ही जगासाठी देण असल्याने संपूर्ण जगाला बापूंच्या विचाराशिवाय पर्याय नसल्याचे युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट आॅफ पीस एशिया सेंटरचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी रफीउल्लाह स्टनीक झाई म्हणाले.
नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये तीन दिवसांसाठी गौहरशाह खाजगी विद्यापीठ काबूल अफगानीस्थान येथील २४ विद्यार्थी आपल्या दोन प्राध्यापकासह शांती, अंहिसा आणि कृतीशील गांधीविचार समजावून व अध्ययनासाठी आले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
रफीउल्लाह म्हणाले, विद्यापीठात गांधी व अहिंसा यावर शिकविले जाते. संगठनेद्वारे शांती शिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी युवा शांती केंद्राद्वारे महिन्यातून कृतीशिल कार्यक्रम होतो आणि जुने विद्यार्थी नव्यांना यात सहभागी करून शांती आणि अहिंसेचे महत्त्व सांगतात.
प्रशिक्षणसुद्धा दिल्या जाते. नंगरहार व हैरान या राज्य विद्यापीठाचे विद्यार्थी भारतात याच विषयाअंतर्गत येणार असल्याचेही ते म्हणाले.
गांधीजी आणि अहिंसा हे खूप जवळचे वाटतात. त्याचे कारण म्हणजे सरहद गांधी (खान अब्दुल गफ्फार खान) आम्ही सर्व १ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये आलो. गांधी दर्शन समितीमध्ये मुक्काम केला. दि. ५ रोजी सेवाग्राम आणि ७ रोजी परत दिल्लीसाठी रवाना होत आहे. गांधी ते नेल्सन मंडेला या थीमवर नविन बॅच अध्ययन करणार असल्याचे रफीउल्लाह यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)