आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरेच; ऑक्सिजन बेड वाढवण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 01:45 PM2021-04-28T13:45:19+5:302021-04-28T13:45:39+5:30
Wardha news कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येक कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड कसे वाढविता येईल यावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे असले तरी आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरेच आहे, असे मत विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येक कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड कसे वाढविता येईल यावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे असले तरी आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरेच आहे, असे मत विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.
वर्धा दौऱ्यादरम्यान आयोजित जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यांनी यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोविड रुग्णांची परिस्थिती समजावून घेतली.
या भेटीत आयसोलेशन वॉर्डांची पाहणी केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी देशभ्रतार यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, मिलिंद भेंडे आदी उपस्थित होते.