तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:06+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी सुरक्षा साधने द्या, अशी मागणी करण्यास गेलेल्या आशा वर्कर्सना कारंजाचे तहसीलदार, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक दिली या संदर्भात संघटनेने पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार करीत कारवाईची मागणी केली. यापुढे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्यास काम बंदचा इशारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी सुरक्षा साधने द्या, अशी मागणी करण्यास गेलेल्या आशा वर्कर्सना कारंजाचे तहसीलदार, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक दिली या संदर्भात संघटनेने पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार करीत कारवाईची मागणी केली. यापुढे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्यास काम बंदचा इशारा दिला.
सिटूअंतर्गत आशा गटप्रवर्तक संघटनेची बैठक सिटू कार्यालयात झाली. यावेळी विविध समस्या, विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य सचिव यशवंत झाडे, भय्या देशकर, सुनील घिमे, अर्चना घुगरे, राणी हेडाऊ, गुंफा कटारे, मीनाक्षी गायकवाड, सुषमा गुरनुले, अलका पुरी, अलका जराते, सारिका गुल्हाणे, प्रज्ञा चांदेकर, रजनी माने, भारती मसराम, सविता पुरी, जयश्री पाटील, सीमा वानखेडे, कल्पना नाखले, रोहिणी बोबडे, नम्रता देशमुख, सपना गायकवाड, अंजुम शेख, माधवी कुरील, पांडुरंग राऊत आदी उपस्थित होमते. बैठकीत किन्हाळा बोथली येथील दुर्गा लांडगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.