वर्धा जिल्ह्यावरून जाणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:19 PM2019-02-11T14:19:19+5:302019-02-11T14:21:12+5:30
१२ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यावरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जाणार आहे. खगोलप्रेमींनी ही अभूतपूर्व घटना पाहावी, असे आवाहन खगोल शास्त्रीय अभ्यासकांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आकाशातील विविध घटनांविषयी सर्वसामान्य नागरिक, अभ्यासक, खगोलप्रेमी यांना कायम कुतूहल राहिले आहे. खगोल शास्त्रातील अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांसाठी यावेळी दुसऱ्यांदा संधी उपलब्ध होत आहे. १२ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यावरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जाणार आहे. खगोलप्रेमींनी ही अभूतपूर्व घटना पाहावी, असे आवाहन खगोल शास्त्रीय अभ्यासकांनी केले आहे.
१९ जानेवारीला वर्धा शहरावरून यापूर्वी एक स्पेस स्टेशन गेले होते. ते सायंकाळी ६.३६ वाजता दक्षिण दिशेच्या उजवीकडून (नैऋत्य) गेले होते. आता १२ फेब्रुवारीला स्पेस स्टेशन पुन्हा सायंकाळी ७ वाजून ८ मिनिटांनी पश्चिम दिशेच्या उजवीकडून (वायव्य) येणार आहे. ते ७.१५ वाजता दक्षिण दिशेच्या डावीकडे (आग्नेय) दिशेला रवाना होईल. हे संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून दिसणार आहे.
आकाशातून जाताना ते ठळक ता१२ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यावरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जाणार आहे. खगोलप्रेमींनी ही अभूतपूर्व घटना पाहावी, असे आवाहन खगोल शास्त्रीय अभ्यासकांनी केले आहेप्रमाणे दिसणार आहे. यावेळी त्याची उंची ४२३ किलोमीटर राहील, तर गती प्रतिसेकंद ७.६६ किमी राहील. यावेळी त्याची तेजस्विता -२.९ राहील, अशी माहिती पंकज वंजारे यांनी लोकमतशी बोलताना दिली.