कार्यशाळेतून महिलांना इंटरनेट वापराची माहिती
By admin | Published: May 30, 2017 01:09 AM2017-05-30T01:09:22+5:302017-05-30T01:09:22+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि एका खासगी संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील निवडक गावामध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि एका खासगी संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील निवडक गावामध्ये महिला इंटरनेट जागरुकता अभियान ‘इंटरनेट साथी’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पांतर्गत स्वयंसहायता गटातील महिलांना त्यांच्या जीवनात टॅब किंवा स्मार्टफोन द्वारे इंटरनेटचा वापर करण्यात यावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून इंटरनेट सखीना टॅब व स्मार्टफोन वाटप करण्यात आले.
या प्रशिक्षणाचे सेवाग्रामच्या यात्री निवासात करण्यात आले आहे. प्रशिक्षणाकरिता जि.प. मुख्य कार्यपालन नयना गुंडे, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षक म्हणून सोमेश भोसले, नागराज तसेच जिल्हा व्यवस्थापक स्वनियंत्रण व मुल्यांकन विभागाच्या अल्पना बोस, एमआयएसचे तालुका व्यवस्थापक गोपाल साबळे, क्षमता बांधणी, हेमंत सूर्यवंशी, आर्थिक समावेशनचे तालुका व्यवस्थापक हेमंत काकडे, उपस्थित होते. कार्यक्रमात महाराष्ट्रातील समाविष्ट २६ तालुक्यांमध्ये वर्धा जिल्ह्याचे तीन तालुके वर्धा, देवळी आणि सेलू असून जानेवारी २०१७ मध्ये १६५ इन्टरनेट सखींची निवड करण्यात आली. राज्य अभियान व्यवस्थापन निर्देशानुसार सदर इंटरनेट सखींना दोन दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.