अट्टल घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:36 AM2017-07-23T00:36:44+5:302017-07-23T00:36:44+5:30

अनेक चोरीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा रामनगर पोलिसांच्या हाती आला आहे.

Intrigue in the trap of burglar police | अट्टल घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात

अट्टल घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात

Next

रामनगर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अनेक चोरीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा रामनगर पोलिसांच्या हाती आला आहे. त्याने शहरात केलेल्या चोरीची कबुली दिली आहे.
पोलीस सुत्रानुसार, रामनगर ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना चोरीच्या पद्धतीवरून पोलिसांनी विशाल चंदू कुराळे (२०) रा. वडर झोपडपट्टी, आर्वी नाका याला संशयीत म्हणून ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याजवळून चोरीतील काही मुद्देमाल जप्त केला आहे. इतर मुद्देमालाचा शोध सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण पथकाचे जमादार सुनील भगत, आकाश चुंगडे, संतोष कुकडकर, नरेंन्द्र कांबळे यांनी केली.

कारंजा येथील दानपेटी चोर अटकेत
कारंजा (घाडगे) - शहरातील विठ्ठल टेकडीवरील परिसरात असलेल्या मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी काटोल येथील आकाश नारायण कुशवाह (२१) याला अटक केली आहे. त्याने चोरीची कबुली दिली आहे.
पोलीस सुत्रानूसार, कारंजा शहरातील विठ्ठल टेकडीवरील ज्ञानेश्वर मंदिरातून चोरट्याने दानपेटी लंपास केल्याची तक्रार ताराचंद चाफले यांनी दाखल केली होती. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याकडून तपास सुरू असताना सदर चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आला. यात मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आकाश कुशवाह याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबुल केला. सदर गुन्ह्यात आरोपीकडून १ हजार १२६ रुपये जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई हवालदार सलाम कुरेशी, दिनेश कांबळे, किशोर अप्तुरकर, कुणाल हिवसे, आत्माराम भोयर यांनी केली.
 

Web Title: Intrigue in the trap of burglar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.