राहूल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 01:28 AM2017-08-06T01:28:05+5:302017-08-06T01:30:31+5:30

पूर पीडितांची व्यथा समजून घेण्यासाठी गुजरात मध्ये गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या गाडीवर काहींनी दगडफेक केली.

Invasion of Rahul Gandhi | राहूल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

राहूल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देआर्वी व वर्धेत उमटले पडसाद : दोषींवर कठोर कार्यवाही करा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पूर पीडितांची व्यथा समजून घेण्यासाठी गुजरात मध्ये गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या गाडीवर काहींनी दगडफेक केली. हा प्रकार निंदनिय असून या घटनेतील दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशाहीचा अवलंब करीत असल्याने तसेच भाजपाचीही हुकुमशाही दिवसेंदिवस वाढत असल्याने आम्ही त्याचा निषेध करतो. गुजरात मधील बनासकांठा या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या वाहनावर काहींनी दगडफेक केली. हा प्रकार लोकशाहीचा गळा दाबून त्याची हत्या करणाराच आहे. भारत हा लोकशाही स्वीकारणारा देश असून या घटनेतील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. निवेदन देताना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सायली वंजारी, जोत्स्रा ढाले, वादाफळे, वानखेडे, मुटे, जया गायधने, नलिनी भोयर, पवार, रंजना पवार, छाया पुरके, कुंदा भोयर, योगीता मानकट आदींची उपस्थिती होती.

उपविभागीय अधिकाºयांना निवेदन
आर्वी - काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ला ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील हल्लेखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आर्वी शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात मधील बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी गुजरात राज्य सरकारची असताना राज्य सरकारकडून सुरक्षा व्यवस्थेत जाणिवपूर्वक कमतरता ठेवण्यात आल्याचा आरोप निवदेनातून करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना सुधीर वाकोडकर, धनंजय चौबे, बाबाराव अवथळे, मधुकर सोमकुवर, कृष्ण भाकरे, गजानन गावंडे, सचिन वैद्य, अमोल दहाट, अ‍ॅड दीपक मोटवाणी, महादेव निखाडे, रज्जाक अली, भोजराज भोवरे, राजू रत्नपारखी, प्रविण कडू, गंगाधर तायवाडे, पद्माकर मुडे, स्वप्नील कैलुके, प्रविण खोंडे, संजय पडोळे, किशोर सेलोकर, ललित साहु, मिलींद आवते, रवी नाखले, सुनील साळवे, कैलास जैन, टिकाराम चौधरी, चंद्रकांत राऊत, राहुल बोरघडे आदी उपस्थित होते.

Web Title: Invasion of Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.