अपघातानंतर सुरू असलेल्या चौकशीमुळे ‘उत्तम’च्या प्रोडक्शनला लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:00 AM2021-02-08T05:00:00+5:302021-02-08T05:00:27+5:30
बुधवार ३ फेब्रुवारीला भुगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील प्लॅन्ट मधील ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात तब्बल ३८ कामगार भाजल्या गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. शनिवारी ना. बच्चू कडू तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी रुग्णालय गाठून जखमींची भेट घेतली. तर रविवारी औद्यागीक सुरक्षा, आरोग्य विभागाच्या उपसंचालक पल्लवी गंपावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उत्तम गलवा कंपनी काठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कामगार राज्य मंत्री बच्चू कडू तसेच पालकमंत्री सुनील केदार यांच्या शनिवारच्या वर्धा दौऱ्यानंतर रविवारी सकाळी औद्योगीक सुरक्षा, आरोग्य विभागाच्या उपसंचालक पल्लवी गंपावार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भुगाव येथील उत्तम गलवा कंपनी गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. औद्योगीक सुरक्षा, आरोग्य विभागाकडून या घटनेशी संबंधित तांत्रिक व विविध गाेष्टींची माहिती घेतली जात असून त्यांची चौकशी पूर्ण होईस्तोवर उत्तमचे प्रोडक्शन बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.
बुधवार ३ फेब्रुवारीला भुगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील प्लॅन्ट मधील ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात तब्बल ३८ कामगार भाजल्या गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. शनिवारी ना. बच्चू कडू तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी रुग्णालय गाठून जखमींची भेट घेतली. तर रविवारी औद्यागीक सुरक्षा, आरोग्य विभागाच्या उपसंचालक पल्लवी गंपावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उत्तम गलवा कंपनी काठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
शिवाय कंपनीचे सुरक्षा अधिकारी तसेच प्लॅन्ट इंचार्ज, उत्तमचे काही कामगार यांच्याशी संवाद साधून अधिकची माहिती गोळा केली. याप्रसंगी गंपावार यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संभाव्य धोका लक्षात घेवून अनसेफ साहित्य सेफ करावे; पण चौकशी पूर्ण होईस्तोवर प्रोडक्शन बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सखोल चौकशीला आठवडा लागण्याची शक्यता
उत्तम गलवा कंपनीतील अपघाताची सखोल चौकशी तसेच तज्ज्ञाकडून अधिकची माहिती घेण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रविवारी सकाळी आम्ही उत्तम गलवा कंपनी गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी काही मार्गदर्शक सूचना आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल शासनाला तसेच वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.
- पल्लवी गंपावार,
उपसंचालक, औद्योगीक सुरक्षा, आरोग्य विभाग, नागपूर.