रस्त्याच्या मधोमध उभ्या वाहनांमुळे अपघातास निमंत्रण
By admin | Published: October 28, 2015 02:30 AM2015-10-28T02:30:28+5:302015-10-28T02:30:28+5:30
शहरातील रस्ते व बाजारपेठ विद्यार्थी व पालकांनी गजबजलेली आहे. शहरातून हैदराबाद,
प्रशासनाचे दुर्लक्ष : वाहतूक होते प्रभावित
पुलगाव : शहरातील रस्ते व बाजारपेठ विद्यार्थी व पालकांनी गजबजलेली आहे. शहरातून हैदराबाद, भोपाळ व नागपूर, मुंबई हे महामार्ग जातात. या दोन्ही महामार्गावर जड वाहनाची मोठी वर्दळ सुरू असते. तसेच रेल्वे स्टेशन ते नाचणगाव व कॉटन मील ते नगर परिषद हायस्कूल या मार्गावर रेल्वे व बसचे प्रवासी, शाळा व महाविद्यालयीन, विद्यार्थी यांचीही वर्दळ असते. यातच दोन्ही मार्गावर रस्त्याच्या मध्यापर्यंत उभी राहणारी वाहने अपघातास निमत्रंण देत आहेत.
शहरातील या दोन्ही मार्गावर शाळा, महाविद्यालय, बँक, दवाखाना, न्यायालय, रेल्वे, बसस्थानक व व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. शहरातील बाजार पेठेत शैक्षणिक विद्यार्थी व पालकांची गर्दी असते. शहरात वाढलेली वाहनाची संख्या तसेच शाळकरी मुलांपासून तर महिला व आबालवृद्धापर्यंत होणारा वाहनाचा वापर पाहता या दोन्ही मार्गावर तासनतास उभी राहणारी वाहने लहान मोठ्या अपघातास निमत्रंण देत आहेत. शिवाय स्टेशन चौकात येणाऱ्या प्रवाश्यांची वर्दळ, वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे दुचाकी वाहनचालकांना व प्रवाश्यांना मार्ग काढणे कठीण जाते. रेल्वे फाटक तासनतास बंद राहते. परिणामी भोपाळ कडून ये का करणाऱ्या वाहनांची लाबलचक रांग असते.
उड्डाण पुलाचा प्रश्न अद्यापही न सुटल्याने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी काही ढोस पावले उचलणे गरजेचे आहे. पण ती उचलण्यात येत नसल्याने हा तिढा वाढतच चालला आहे. परिणामी वाहतुकीचा तिढा वाढतच चालला आहे.(तालुका प्रतिनिधी)