लोंबकळणाऱ्या वीजतारा देतात अपघाताला निमंत्रण

By admin | Published: May 30, 2017 01:08 AM2017-05-30T01:08:17+5:302017-05-30T01:08:17+5:30

सध्या शेतीच्या मशागतीचे कामे अंतिमटप्प्यात आहे. मात्र शेतातून जाणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.

Invitation to the accident gives power to electricity | लोंबकळणाऱ्या वीजतारा देतात अपघाताला निमंत्रण

लोंबकळणाऱ्या वीजतारा देतात अपघाताला निमंत्रण

Next

शेतीची कामे करताना अडचण : वीज खांबांना ताण देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सध्या शेतीच्या मशागतीचे कामे अंतिमटप्प्यात आहे. मात्र शेतातून जाणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. शेतशिवारात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सेलू शिवारातील शेत सर्व्हे नं. २५६ मध्ये गत काही महिन्यांपासून विद्युत तारा लोंबकळत आहे. शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करताना त्या तारा अडचणीच्या ठरत आहे. अनेक वेळा शेतकरी अनिल काटोले यांनी वीज वितरण कार्यालयाला कळविले असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या जिवंत तारा अपघातास कारणीभुत ठरण्याचा धोका अधिक आहे. शेतात काम करताना शेतकरी मजूर जीव मुठीत घेऊन काम करीत आहे.
असाच प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. शेतातील तक्रारीचा निपटारा करण्यास टाळाटाळ का केली जाते हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. बहुतांश ठिकाणी नवीन वीज जोडणीला सिमेंटचे खांब वापरले जात आहे. हे खांब काही ठिकाणी जमिनीला टेकत आहे. तर कुठे तारांच्या आधारे उभे आहे. शेतात दिवसाची रात्र करणाऱ्या शेतकऱ्याला अडचणीचे ठरू पाहत आहे. अनिल काटोले यांचे शेतातून वडगावकडे वीज पुरवठा करणारे खांब गेले आहे. त्यामुळे वीज खांबांना तंगावा देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामातील पिकाचे नुकसान होवू नये तसेच वारागर्दीमुळे तार तुटल्यास अपघात घडू नये यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी अनिल काटोले तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
याची दखल घेत त्वरीत उपाययओजना करण्याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.

वीजखांब वाकल्याने तारा लोंबकळल्या
सेवाग्राम : आदर्श नगर येथील वीज खांब वाकल्याने तारा लोंबकळल्या आहे. पाऊस व वादळामुळे लोंबकळ्त्या तारांमध्ये घर्षण होऊन धोक्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
सेवाग्राम-वर्धा मार्गावर असलेल्या आदर्शनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुचा खांब वाकला आहे. शिवाय काही तारा खाली लोंबकळत आहे. वाकलेल्या वीज खांबाला तंगाव्याचा आधार नाही. यामुळे आदर्शनगर वसाहत आणि हुतात्मा स्मारकाकडे गेलेल्या वीज तारा लोंबकळलेल्या स्थितीत आहे. येथील वीज जोडणी जुनी आहे. रस्त्याचे बांधकाम झाल्याने उंची वाढली आहे. परिणामी रस्ता आणि वीजतारा यातील अंतर कमी झाले आहे. वाहन चालकांसाठी ही बाब धोकादायक ठरत आहे. वादळामुळे येथे अपघताची शक्यता निर्माण झाली आहे. येथील धोका लक्षात घेता वाकलेला वीज खांब व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Invitation to the accident gives power to electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.