‘तो’ खड्डा ठरतोय धोकादायक

By Admin | Published: March 7, 2017 01:18 AM2017-03-07T01:18:58+5:302017-03-07T01:18:58+5:30

शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. ठाकरे मार्केट समोरील भागात रस्त्यावरील खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

'It' dangerous for the pit to be dangerous | ‘तो’ खड्डा ठरतोय धोकादायक

‘तो’ खड्डा ठरतोय धोकादायक

googlenewsNext

अपघाताला निमंत्रण : डागडुजी करण्याची मागणी
वर्धा : शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. ठाकरे मार्केट समोरील भागात रस्त्यावरील खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. अनेकदा वाहन चालकांना हा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होतो. सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या खड्ड्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाला दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या काळात रस्त्याची डागडुजी करण्याची गरज भासली नाही. मात्र आता रस्त्याला काही भागात खड्डे पडले आहे. हे खड्डे वेळीच बुजविले तर रस्त्याची दैना होणार नाही, याकडे संबंधीत यंत्रणेने लक्ष देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शहरातील मुख्य रस्ता असल्याने येथून दिवसरात्र वाहनांची ये-जा सुरू असते. या मार्गाने जडवाहतूक होत नसली तरी रात्री १० दहानंतर जडवाहने या रस्त्याने धावतात. ठाकरे मार्केट परिसरात रस्त्याच्या एका बाजुला असलेला हा खड्डा अनेकदा वाहन चालकांना दिसून येत नाही. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना अपघाताचा धोका संभवतो. खड्डा चुुकविण्याच्या प्रयत्नात येथे अपघात झाले आहे. खड्ड्यातून वाहन उसळत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास होतो. विद्यार्थ्यांची या मार्गाने सतत ये-जा सुरू असते.
या भागातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्याची मागणी वाहन धारकांतून होत आहे. याबाबत होत असलेल्या कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 'It' dangerous for the pit to be dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.