नितिमान समाज निर्मितीसाठी कायद्याचे पालन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:34 PM2018-09-28T22:34:12+5:302018-09-28T22:35:11+5:30
माणुस कायद्यासाठी नसून कायदा हा माणसासाठी निर्माण झालेला आहे. माणसाचे सामाजिक जीवन आबाधित राहण्यासाठी विशीष्ट नियमावली तया करण्यात आली असून त्याला कायदा असे नाव देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : माणुस कायद्यासाठी नसून कायदा हा माणसासाठी निर्माण झालेला आहे. माणसाचे सामाजिक जीवन आबाधित राहण्यासाठी विशीष्ट नियमावली तया करण्यात आली असून त्याला कायदा असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकांने आपली कर्तव्ये योग्य प्रकारे काळजीपूर्वक पार पाडून नितिमान समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, कारण नितिमान समाज निर्मितीसाठी कायद्याची नितांत आवश्यकता आहे, असे उद्गार अॅड. अजित सदावर्ते यांनी काढले. स्थानिक यशवंत महाविद्यालयातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. तसेच प्रमुख पाहुणे विधी विभाग प्रमुख डॉ. रविशंकर मोर, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप देशमुख, प्रा. संदीप रायबोले मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉ. रविशंकर मोर यांनी स्त्रियांनी स्वत:ला दुय्यम समजू नये तर समाजाचा एक सशक्त घटक म्हणून तिने आपली जबाबदारी पार पाडावी. स्वत:च्या पायावर उभे राहून इतरांच्या कल्याणाचा विचारही तिने करावा, असे सांगून स्त्री-पुरूष भेदभाव न मानता समाजहित लक्षात घेऊन प्रत्येकाने आपे कर्तव्य पार पडावे, असे त्यांनी म्हटले. प्रास्ताविक प्रा. संदीप रायबोले यांनी केले.
तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. समाजशास्त्र मंडळाच्या अध्यक्षा शिवाणी काटोले, उपाध्यक्ष सुवर्णा ठाकरे, कोषाध्यक्ष सीमरन खान व सदस्य किरण पाटमासे, सोनल गुडवार, स्वाती मरापे, वैष्णवी झाडे यांचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. संचालन प्रवीण गवते यांनी तर आभार शीतल लगडे यांनी मानले. यावेळी विद्याथी उपस्थित होते.