शिकण्याची इच्छा असली तरच अंगीभूत कौशल्यांचा विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:57 PM2018-03-28T23:57:50+5:302018-03-28T23:57:50+5:30

देशात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नोकऱ्या कमी पडत आहे. त्यामुळे उच्च शिक्षित तरुणही नोकरीच्या शोधात भटकताना दिसतता.

It is possible to develop intangible skills only if we want to learn | शिकण्याची इच्छा असली तरच अंगीभूत कौशल्यांचा विकास शक्य

शिकण्याची इच्छा असली तरच अंगीभूत कौशल्यांचा विकास शक्य

Next
ठळक मुद्देशितल गाते : प्रधानमंत्री मुद्रा योजनेत प्रसार मेळावा

ऑनलाईन लोकमत
पुलगाव : देशात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नोकऱ्या कमी पडत आहे. त्यामुळे उच्च शिक्षित तरुणही नोकरीच्या शोधात भटकताना दिसतता. आजच्या युवा पिढीने नोकरीच्या मागे न धावता दुसºयांना नोकरी देण्यासाठी स्वत: उद्योजक बना. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना त्यापैकी एक. इच्छा असली तरच तरुणांना अंगीभूत कौशल्य विकसीत करता येईल, असे मत नगराध्यक्ष शितल गाते यांनी व्यक्त केलेल्.
हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रचार व प्रसार मेळाव्याचे उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण निरीक्षक विशाल रांगणे, कौशल्य विकास व उद्योजकता सहायक संचालक डी.एम. गोस्वामी, जिल्हा अग्रणी बॅँकेचे प्रबंधक वामन कोहाड, प्राचार्य देवानंद गायधनी, प्रशिक्षण अधिकारी महाजन, प्राचार्य संदीप बोरकर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बोरकर यांनी केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य कुंभार महासंघाचे अध्यक्ष संजय गाते यांनी मुद्रा योजनेचा बेरोजगारांना लाभ देताना बॅँकेकडून निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत माहिती दिली. प्रबंधक कोहाड यांनी सेवा, व्यापार व निर्मिती या तीन क्षेत्रासाठी मुद्रा ऋण देते. शिशु, किशोर व तरुण असे तीन भाग असून योजनेतून ५० हजार ते १० लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. या मेळाव्यात डॉ. युगल रायल, सी.ए. दिपक कुंभारे, राकेश कदम, सुरेश गजराज, शिवाजी चौधरी, बॅँकचे प्रतिनिधी उमेश ठाकुर यांनी मार्गदर्शन केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेवून यशस्वी उद्योजक ठरलेले प्रविण ठवळी, सुरज तीखे, वैभव टाले यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव केला. संचालन श्रीकांत बुलकुंडे यांनी केले. मेळाव्याला बबन टाले तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मुद्रा योजना प्रचार व प्रसार मेळावा
आष्टी (शहीद) - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने मुद्रा योजना प्रचार व प्रसार मेळावा घेण्यात आला. औद्योगिकीकरणाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना औद्योगिक विकासात सामावून घेण्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक पाठबळ, त्या अनुषंगाने शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यातील व्यावसायीक शिक्षण देणाऱ्या संस्था, हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, तांत्रिक शिक्षण घेतलेले व व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झालेले संस्थेतील आजी व माजी विद्यार्थ्यांनी नावांची नोंद केली. यशस्वी उद्योजक व व्यावसायिकांचा कार्यक्रमस्थळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष भरत वणझारा, उद्घाटक वामन कोहाड, विशेष पाहुणे आर.के. सूर्यवंशी, आर.आर. मिश्रा, निलेश कदम, युगुल रायलु, अरविंद गिरी, दिरुडकर, शारदा ढोले, कुंभारे या सर्व मान्यवरांनी मुद्रा योजनेची व्याप्ती व शासनाच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ३५० विद्यार्थ्यांनी पुर्ण वेळ उपस्थिती दर्शविली. मुद्रा योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक, औद्योगिक संस्थेचे प्राचार्य जोशी यांनी केले. संचालन प्रा. गुणवंत मानमोडे व आभार प्रदर्शन मुसळे यांनी केले.

Web Title: It is possible to develop intangible skills only if we want to learn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.