सुलतानशाही सरकारला मातीत घालण्याची वेळ आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:09 AM2017-08-10T02:09:07+5:302017-08-10T02:09:49+5:30
शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचा शुभारंभ या पवित्र व पावनभूमीतून करण्याचा हेतू फार मोठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचा शुभारंभ या पवित्र व पावनभूमीतून करण्याचा हेतू फार मोठा आहे. गांधीजींनी मुठभर मीठ उचलून ब्रिटीश सत्येला आव्हान दिले. त्यावेळी काही लोकांनी बापूंवर टीका केली; पण तेच मूठभर मीठ उचलल्यामुळे देशात स्वातंत्र चळवळीचे वातावरण निर्माण झाले. शेतकºयांच्या आंदोलनासाठी हजारो कार्यकर्ते तुरंगात गेले. ते आज कुठे दिसत नाही; पण प्रत्येक शेतकºयांच्या मनात आग खदखदत आहे. सत्तेत येण्यापूर्वीच्या आश्वासनांचे विस्मरण सरकारला झाले असून सुलतानशाही सरकारला मातीत घालण्याची वेळ आली आहे, असे परखड मत शंकर अण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी आश्रमात किसान मंचच्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाला क्रांती दिनापासून सेवाग्राम ते नाशिक, अशी शुभारंभ सभा आयोजित होती. यावेळी माजी आमदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी वर्धेत निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती. आता सरकारने निराशा केली. कर्जमाफी दिली तरी सरकारला पुढच्या कर्जमाफीची तयारी करावी लागेल. यापेक्षा शेती उत्पादनालाच असा भाव द्यावा, की जेणेकरून तो फायद्यात राहील, अशा मागणीचा रेटा ठेवावा लागेल. किशोर माथनकर म्हणाले की, क्रांती दिनाला या अभियानाचा प्रारंभ गांधीजींच्या आश्रमातून होत आहे. ‘चले जाव’च्या नाºयाने देश पेटून उठला आता शेतकरी पेटून उठण्यासाठी ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाने व्हावे; पण विरोधाचा एल्गार दिसत नसल्याने आंदोलनाची पायाभरणी उद्दिष्ट पूर्तीने व्हावी.
याप्रसंगी जयवंत मठकर, माजी आमदार वसंत कार्लेकर, दत्ता पवार, राजू राऊत, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, नितीन राऊत, खेमराज कौर, दिवाकर गमे आदींनपी मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन संजय काकडे यांनी केले तर आभार टी.सी. राऊत यांनी मानले. जि.प. सदस्य अशोक तेलंग, लक्ष्मीनारायण सोनोने, शशांक घोडमारे, प्रा. स्वप्नील देशमुख, कृउबास सभापती श्याम कार्लेकर, अविनाश काकडे, सुनील भोगे, हातिम बाबू, विलास पाखरे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सेवाग्राम, हिंगणघाट येथे रस्ता रोको
किसान मंचचे शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान ५४ दिवसांचे असून २ आॅक्टोबर रोजी नाशिक येथे शेतकरी अधिवेशनाने समारोप होणार आहे. ३२ जिल्ह्यांत अभियानातून शेतकºयांशी चर्चा केली जाणार आहे. प्रारंभी बापूकुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना व भजन झाले. यानंतर किसान मंचच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सेवाग्राम आणि हिंगणघाट येथे प्रतिकात्मक रस्तारोको करीत अभियानातील विविध आंदोलनांचा परिचय दिला.