Wardha Blast; ... तर मोठा अनर्थ घडला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:49 PM2018-11-20T17:49:49+5:302018-11-20T17:55:12+5:30

पेटीतील अनेक बॉम्ब एकाचवेळेस फुटल्याने यातील एक बॉम्ब जवळच उभ्या असलेल्या मिलीटरी व्हॅनच्या टायरला छेदून गेला. हा बॉम्ब व्हॅनमधील दारूगोळ्यात पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

... it would have been a great disaster | Wardha Blast; ... तर मोठा अनर्थ घडला असता

Wardha Blast; ... तर मोठा अनर्थ घडला असता

Next
ठळक मुद्देएका पेटीत होते अनेक बॉम्ब



हरिदास ढोक।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मंगळवारी सकाळी जबलपूर दारूगोळा भांडारातील जिवंत बॉम्ब येथील आरक्षित जागेत निकामी करण्याची प्रक्रिया पार पाडली जात होती. घटनास्थळावर शेकडो बॉम्ब असलेल्या व्हॅनमधून पेट्या खाली उतरविल्या जात होत्या. त्या पेट्या एक-एक करून जमिनीतील खोल खंदकांपर्यंत पोहचवित असताना एक पेटी मृतक नारायण पचारे यांच्या डोक्यावरून खाली पडल्याने ही घटना घडली.
पेटीतील अनेक बॉम्ब एकाचवेळेस फुटल्याने यातील एक बॉम्ब जवळच उभ्या असलेल्या मिलीटरी व्हॅनच्या टायरला छेदून गेला. हा बॉम्ब व्हॅनमधील दारूगोळ्यात पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या घटनेत जबलपूर येथील दारू भांडारातील अधिकारी उदय वीरसिंग (२७) यांच्यासह सोनेगाव आबाजी येथील विलास लक्ष्मण पचारे (४०) व नारायण श्यामराव पचारे (५५), प्रवीण प्रकाश मुंजेवार (२५) रा.केळापूर हे चार जण जागीच ठार झाले. तसेच प्रभाकर रामदास वानखेडे (४०) रा. सोनेगाव (आबाजी) व राजकुमार राहुल भोवते (२३) रा. केळापूर हे दोघे जण सावंगी रूग्णालयात नेत असताना वाटेवर मरण पावले. या व्यतिरिक्त घटनेतील ११ जण जखमी असून यामध्ये विकास शेषराव बेलसरे, संदीप शंकर पचारे, रूपराव सीताराम नैताम, हनुमान सराटे, रा. सर्व सोनेगाव (आबाजी), दिलीप निमगाडे, मनोज मोरे, प्रशांत मुंजेवार, रा. सर्व रा. केळापूर, मनोज सयाम, प्रविण सिडाम, प्रशांत मडावी, ईस्माईल मो. शहा रा. सर्व जामनी (चिकणी) यांचा समावेश आहे. यातील प्रवीण सिडाम, प्रशांत मुंजेवार, दिलीप निमगाडे व मनोज मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहे. हे सर्व पुलगाव येथील अनधिकृत कंत्राटदार शंकर चांडक व अशोक चांडक यांच्याकडे रोजमजूरीने काम करीत होते, अशी माहिती पुढे आली आहे. घटनेनंतर चांडक बंधूवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी जोरदार आक्रोश केला.
घटनास्थळी ठार झालेल्या दोन मृतकांवर घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉ. इंद्रजीत खांडेकर, डॉ. प्रवीण झोपाटे, डॉ. राजेश कुडे या फॉरेन्सीक तज्ज्ञांनी शवविच्छेदन केले. दोन मृतदेह सावंगी येथील रुग्णालयात होते. त्यांच्यावर सुद्धा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी व पंचनामा करण्यात आला. घटनास्थळाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे, तहसीलदार बोंबर्डे, देवळीचे ठाणेदार दिलीप ठाकूर व पुलगाव दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. यातील जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुग्णालयात जावून माजी खासदार दत्ता मेघे, चारूलता टोकस, शोभा तडस आदींनी भेट देवून जखमींची विचारपूस केली.

Web Title: ... it would have been a great disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.