लोकमतच्या हवाई सफरीचा आनंद आभाळा एवढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 09:53 PM2019-07-21T21:53:55+5:302019-07-21T21:56:26+5:30
सेलू सारख्या ग्रामीण भागात राहत असल्याने आकाशातून कधी विमान जातानाचा आवाज आला की हातचे सर्व सोडून आम्ही अंगणात येवून आकाशात विमानाचा शोध घ्यायचो. ते पाहिल्यावर विमानात बसण्याची इच्छा व्हायची. ‘लोकमत’ च्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून एकमेव माझी नागपूर-दिल्ली विमानप्रवासाठी निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : सेलू सारख्या ग्रामीण भागात राहत असल्याने आकाशातून कधी विमान जातानाचा आवाज आला की हातचे सर्व सोडून आम्ही अंगणात येवून आकाशात विमानाचा शोध घ्यायचो. ते पाहिल्यावर विमानात बसण्याची इच्छा व्हायची. ‘लोकमत’ च्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून एकमेव माझी नागपूर-दिल्ली विमानप्रवासाठी निवड झाली. त्यामुळे हवाई सफरीचे स्वप्नही पूर्ण झाले. ‘लोकमत’ च्या हवाई सफरीचा आनंद माझ्यासाठी आभाळा एवढा आहे, असे सांगून दीपचंद चौधरी विद्यालयाची विद्यार्थीनी साक्षी रमेश पाटील हिने आपले अनुभव कथन केले.
काही निवडक शाळांमधून ‘लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा’ हा उपक्रम राबविल्या जातो. साक्षी सातवीत असतांना या स्पर्धेची विजेती ठरली, ती आता आठवीत आहे. या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत साक्षी विमानतळावर गेली. कुतुहलापोटी त्या परिसराचा कोपरा न कोपरा न्याहाळला. तेथील विमाने पाहून अक्षरश: आनंदाला पारावार राहीला नाही. विमानात बसल्यावर नागपूर वरुन दीड तासात दिल्लीला पोहोचले. विमानात कसे बसायचे तेथे कशी व्यवस्था असते हे विमानात बसल्यावर कळले. तो पर्यंत छातीचे ठोके वाढले होते. पहिल्यांदा विमानात बसत असल्याने मला विमानातील बारीक सारीक गोष्टी टिपतांना व मैत्रिणीशी गप्पा करताना दिल्लीला कसे पोहोचले हे कळलेच नाही. दिल्लीच्या विमान तळाचा झगमगाट पाहून स्वर्गाचा आनंद झाला. दुपारी १.३० च्या सुमारास संसद भवनात पोहोचले. येथे ना. नितीन गडकरी, ना. अॅड. संजय धोत्रे या मान्यवरांनी आमचे स्वागत केले. सर्वांशी मन मोकळा संवाद साधला. राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, ऐतिहासिक लालकिल्ला व बरेच काही डोळ्यात साठविले. रात्री १० वाजता दिल्ली विमानतळावरुन आम्ही नागपूरकडे उड्डाण केले. हे सर्व लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेमुळेच साध्य झाल्याचेही साक्षीने यावेळी सांगितले.
माझी मुलगी सातवीत शिकत असताना शाळेत लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा सुरू झाली. मुलीच्या आग्रहाने मी घरी लोकमत सुरू केला. ती रोज लोकमतला येणारा परिपाठ वाचून कात्रणे कापून ठेवायची. प्रवेशिकेवर चिपकवायची यातून तिच्या ज्ञानातही खूप भर पडली व आज ती जिल्ह्यातून विजेती ठरल्याने तिची विमान प्रवासासाठी निवड झाली. माझ्या मुलीचे घरी येवून खुप जनांनी अभिनंदन केले. मी लोकमतचा ऋणी आहे.
- रमेश पाटील, साक्षीचे वडिल, सेलू.