गणेशोत्सवातून ‘लेक वाचवा’ चा जागर
By admin | Published: September 11, 2016 12:44 AM2016-09-11T00:44:12+5:302016-09-11T00:44:12+5:30
येथे ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेवर आधारित गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. याला १३ वर्षांची परंपरा आहे.
सामाजिक संदेश : एक गाव एक गणपती उपक्रमात जनजागृती
समुद्रपूर : येथे ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेवर आधारित गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. याला १३ वर्षांची परंपरा आहे. यातून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यंदा बाल गणेश उत्सव मंडळाच्यावतींने ‘बेटी बचाओ’ ही मोहीम हाती घेण्यात आली आसूम यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मोहिमेतून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्याकरिता जनजागृती करण्यात आली. बाल गणेश उत्सव मंडळाकडून सामाजिक शांतता व सलोखा निर्माण करण्याकरिता असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाते याच उपक्रमाकरिता मंडळाला गौरन्वित करण्यात आले आहे.
या मिरवणुकीत हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सहभागी होत्या. बेटी बचाओ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनीष गांधी, सौरभ आत्राम, सचिव उमेश फटींग, सहसचिव सुरज ठाकरे, कोषाध्यक्ष वृषभ राजुरकर, सहकोषाध्यक्ष राहुल निकोरे, निर्मल भोयर, नवनित गंगशेट्टीवार, करण झाडे, यशवंत, अक्षय टेंमरे, खडसे व नागरिक उपस्थित होते. तसेच विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक वैद्य, प्रा. नेलहोत्रा, सेलकर, प्रफुल कुडे, पाल, चाफले, चंदनखेडे, वाघमारे, रिठे, नखाते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, उपनरागध्यक्ष रविंद्र झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन कृष्णा धुळे यांनी तर आभार अतुल गुजरकर यांनी मानले. यात विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)