कवी संमेलनातून केला संविधानाचा जागर

By admin | Published: February 10, 2017 01:34 AM2017-02-10T01:34:43+5:302017-02-10T01:36:58+5:30

गौळ येथे घेण्यात आलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात झालेल्या कवी संमेलनातून संविधानाचा जागर करण्यात आला.

The jagir of the Constitution was done by the poet's convention | कवी संमेलनातून केला संविधानाचा जागर

कवी संमेलनातून केला संविधानाचा जागर

Next

प्रबोधनात्मक कार्यक्रम : नामवंत व्यक्तींचा सत्कार कार्यक्रम
वर्धा : गौळ येथे घेण्यात आलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात झालेल्या कवी संमेलनातून संविधानाचा जागर करण्यात आला. यावेळी नामवंत व्यक्तींचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरेश्वर खोडके तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुभाष खंडारे, मार्गदर्शक बी.सी. वानखेडे, प्रा. गणेश मालधुरे, विजय पचारे, डॉ. डी.जी. फुलझेले, सरपंच मारोती लोहवे, योगेश कांबळे, अशोक गायकवाड, इटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन कविश्वर जारुंडे, नारायण जारुंडे यांनी माता अंजना व पिता ऋषी जारुंडे यांच्या तृतीय पुण्यनुमोदन निमित्त केले. या वैशिष्टपूर्ण आयोजनातून परंपरेला फाटा देत जारुंडे परिवाराने संविधानाचा जागर करुन समाजात आदर्श निर्माण केला.
यानंतर परित्राण पाठ झाला. गायक रामेश्वर अलोणे यांनी गीत सादर केले. कवी व गायक विनोद कांबळे यांच्या गीतमाला पुस्तकाचे लोकार्पण डॉ. सुभाष खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. कवी संमेलन डॉ. देवराव फुलझेले यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आले. यात प्रशांत ढोले, प्रा. अरविंद पाटील, चारुलता डोंगरे, विद्यानंद हाडके, प्रकाश बन्सोड, नारायण जारुंडे, नारायण कांबळे, यांनी काव्य सादर करुन प्रेक्षकांचे मने जिंकले. तृतीय सत्रात वर्धा येथील विनोद कांबळे, राजेंद्र कांबळे, अरविंद बुरबुरे व संचाने बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम सादर केला.
प्रास्ताविक नारायण जारुंडे यांनी केले. संचालन राजू थुल यांनी तर आभार कविश्वर जारुंडे यांनी मानले. पुरुषोत्तम कांबळे, नत्थूजी दुधे, संजय कांबळे, गौतम वनकर, गणेश वाघमारे, उमेश चहांदे, निर्मला दुधे, वाघमारे, यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The jagir of the Constitution was done by the poet's convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.