दशलक्षण महापर्वात 'जय जिनेंद्र'चा गजर, रथोत्सवात जैन बांधवांचा मेळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:57 PM2018-09-27T12:57:39+5:302018-09-27T12:59:06+5:30
स्थानिक रामनगर येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदीर येथे शुक्रवार 14 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या दशलक्षण महापर्वाचा समारोप गुरुवार 27 सेप्टेंबरला रथोत्सवाने झाला.
वर्धा : स्थानिक रामनगर येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदीर येथे शुक्रवार 14 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या दशलक्षण महापर्वाचा समारोप गुरुवार 27 सेप्टेंबरला रथोत्सवाने झाला. रथोत्सवात जैन समाजाच्या महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन 'जय जिनेंद्र'चा गजर केला. शुक्रवार 14 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दशलक्षण महापर्वात पूजा, प्रभावना, शास्त्र प्रवचन, आरती तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तर सोमवार 24 सेप्टेंबरला सकाळी 8 वाजता श्री जिनेंद्र अभिषेक, तत्वार्थसूत्र आणि पुण्याह वाचन तसेच क्षमावाणी व सुंठसाखर पार पडले. तर आज रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रामनगर येथील श्री महावीर दिगंबर जैन मंदीर येथुन श्रींना चांदीच्या रथात ठेऊन काढण्यात आलेल्या या रथयात्रेने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. त्यानंतर श्री महावीर दिगंबर जैन मंदीरात श्रींचा पांचमृत अभिषेक आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील मांडवगड़े, नितिन भागवतकर, अजय कहाते, दिलीप भुसारी, सचिन गडेकर, अंजली फुलंबरकर, डॉ. संजय धनुष्कर, किशोर लासने, संजय श्रावने, प्रशांत फुरसुले, मनोज पोफळी, दिलीप चंदोरिया, दिवाकर उदोले, रमेश फरसोले, राजेश भुसारी, स्वपनिल फरसोले, सचिन पळसापुरे, सुनील कहाते, अंकुश पळसापुरे, प्रथमेष कुटे, जितेंद्र पळसापुरे, मयंक चंदोरिया यांच्यासह कार्यकर्ता समिती, जैन महिला मंडळ, जैन युवा मंडळ आणि व्यापारी मित्र मंडळने सहाकार्य केले.