आयटकचे ‘जेलभरो व जवाब दो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 10:22 PM2018-09-06T22:22:01+5:302018-09-06T22:22:49+5:30

अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबीत आहे. शासनाने वारंवार आश्वासन दिली. पण, अद्यापही ते पुर्णत्वास गेले नसल्याने आज गुरुवारला आयटक प्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, आशा व गटप्रवर्तक संघटना,.......

'Jail Bhro and answer' of Aitak | आयटकचे ‘जेलभरो व जवाब दो’

आयटकचे ‘जेलभरो व जवाब दो’

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात : प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबीत आहे. शासनाने वारंवार आश्वासन दिली. पण, अद्यापही ते पुर्णत्वास गेले नसल्याने आज गुरुवारला आयटक प्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन यांच्यावतीने ‘जेलभरो व जवाब दो ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करुन स्थानबध्द केले.
स्थानिक शास्त्री चौकातून आयटकच्या नेतृत्वात सर्व संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. शहरातील मुख्य मार्गांनी निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी ठाकरे चौकात अडवून त्यांना स्थानबध्द केले. वित्तमंत्री अरूण जेटली यांनी १७ आॅगस्ट २०१६ रोजी अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशावर्कर यांना प्रतिदिन ३५० रुपये तर गटप्रवर्तकांना प्रतिदिन ४५० रुपये वेतन, भविष्यनिर्वाह भत्ता व आरोग्य सुविधा लागू करण्याची घोषणा केली होती.परंतू केंद्र सरकारने २ वर्ष लोटुनही शासन आदेश काढलेला नाही. तो आदेश तात्काळ काढावा तसेच केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे अंगणवाडी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आयटकच्या राज्य कौन्सीलच्या अहवालानुसार असंघटीत कामगारांचे प्रश्न व जनतेचे प्रश्न सोडवावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले असून या मागण्याचे निवेदन पंंतप्रधान, वित्तमंत्री, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्यसचिव दिलीप उटाणे, मनोहर पचारे,गजेंद्र सुरकार, असलम पठाण, विजया पावडे, गुणवंत डकरे, सुजाता भगत, ज्ञानेश्वरी डंभारे, वंदना कोळणकर, जयमाला बेलगे, मैना उईके, वैशाली ठवरे, प्रतिभा वाघमारे, वंदना खोब्रागडे, विमल कौरती, शोभा तिवारी, माला भगत, सुनंदा आखाडे, रेखा काचोळे, निर्मला सातपुडके, बबीता चिमोटे, वैशाली नंदरे, वीणा पाटील, रेखा नवले, रमेश बोंदलकर, यमुना नगराळे, शोभा सायंकार, ज्योती कुलकर्णी, शबाना खान, संगीता टोणपे, सुनिता टिपले, सुलभा तिरभाने, सिमा गढीया, अल्का भानसे, आशा गळहाट, कमल डबले, रंजना तांबेकर, विनायक नन्नोरे, रजनी पाटील, माला कुत्तरमारे, इरफाना पठाण, पार्वता जुनघरे, पुष्पा नरांजे, हिरा बावणे, योगिता डहाके, ज्योती वाघमारे, अरूणा नागोसे यांनी केले. या आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.
दहा वचनांचा मागितला जवाब
२०१४ मध्ये पंतप्रधानांनी १० मोठे दिलेले वचन, प्रत्येक वर्षी दोन करोड नवीन नौकºया, शेतकºयांना लागत खर्च अधिक ५० टक्के हमीभाव, विदेशातील काळा पैसा १०० दिवसांत परत आणणार. सर्वांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, १०० स्मार्टसिटी, राममंदिर निर्माण, कश्मिरमधील धारा ३७० हटविणार, गंगा शुद्धीकरण, डॉलर ४० रुपयांवर आणणार, लोकपाल गठन करणार यापैकी कोणते वचन पूर्ण केले व २०१९ पर्यंत पूर्ण करणार काय ? याचा जवाब विचारण्यात आला आहे.
इमारत बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये होत असलेल्या चुकीचा व्यवहार थांबवून खºया कामगारांची नोंदणी करा. या मागणीसाठी सरकारी कामगार अधिकारी धुर्वे यांना निवेदन देण्यात आले.
नुकतेच भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारुन प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Web Title: 'Jail Bhro and answer' of Aitak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.