कारागृहाची क्षमता २५२, प्रत्यक्षात पाचशेवर बंदिवान; त्यातच आले तीन 'इंटरनॅशनल' कैदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:58 PM2024-08-30T16:58:30+5:302024-08-30T17:01:01+5:30

Wardha : गृहविभागाने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची गरज

Jail capacity 252, actual inmates over five hundred; Three 'international' prisoners came in it | कारागृहाची क्षमता २५२, प्रत्यक्षात पाचशेवर बंदिवान; त्यातच आले तीन 'इंटरनॅशनल' कैदी

Jail capacity 252, actual inmates over five hundred; Three 'international' prisoners came in it

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असून, गांधी जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख सर्वदूर आहे. अशा अहिंसेच्या जिल्ह्यात हिंसक घटना सातत्याने वाढत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशातच मंजूर ६६ पदांपैकी १९ पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. 


गुन्हेगारांना ठेवण्याची कारागृहात पुरेशी व्यवस्था नाही. त्यातच कोल्हापूर कारागृहातून वर्धा कारागृहात आलेल्या तीन 'इंटरनॅशनल' बंदिवानांची भर पडली असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्याऱ्यांची झोपच उडाली आहे. डोळ्यांत तेल घालून त्यांना कर्तव्य बजावावे लागत आहे. 


वर्धा जिल्हा कारागृह है वर्ग-१चे कारागृह आहे. कारागृहात महिला व पुरुष पकडून २५२ बंदिवानांची क्षमता आहे. असे असतानाही कारागृहात दुपटीपेक्षा अधिक जवळपास ४०० वर बंदिवानांना कोंबून ठेवण्याची स्थिती असल्याने कारागृह की कोंडवाडा, असा प्रश्न उपस्थित होतो. मंजूर संख्येपेक्षा निम्म्या मनुष्यबळावर कारागृहातील सुरक्षेचा भार असल्याने बंदिवानांच्या सुरक्षा ही चिंतेची बाब ठरत आहे. 


जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखांवर असून, अशातच गुन्हेगारीचा वाढत असलेला आलेख, गुन्हे प्रकटीकरण आणि अटकेतील गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होत असल्याने कारागृह नेहमीच गजबजलेले असते. कारागृहात 'मोक्का'चे ११ गुन्हेगार, एमपीडीएवे सहा गुन्हेगार असून यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, सांगली येथील कारागृहातून वध्र्याच्या कारागृहात वर्ग करण्यात आलेले गुन्हेगार आहेत, तीन आंतरराष्ट्रीय बंदी, गैंगस्टरांचा यात समावेश असल्याने कारागृह 'अलर्ट मोड'वर आहे. कारागृहात नित्याने सकाळी आणि सायंकाळी वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांकडून राऊंड होता तसेच सर्च ऑपरेशनही राबविले जाते.


५० कॅमेऱ्यांच्या निगराणीत नऊ बॅरेक... 
कारागृहात मंजूर पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यातच कारागृहाची क्षमता २५२ असताना विविध गुन्ह्यांतील ५००वर बंदिवान आहेत. व्यवस्थेवर ताण येऊ नये, याअ नुषंगाने ५० सीसीटीव्ही कैमेयाची नजर आहे. कारागृ हातील संपूर्ण बॅरेक कैमेप्याध्या निगराणीत असते. बंदिवानांची सुरक्षा आणि त्यांना सोयीसुविधा पुरविताना कार्यरत मनुष्यबळाची मोठी दमछाक होते. रिक्त पदे भरण्याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून पाठपुरा वादेखील केला जात आहे. मात्र, अद्याप कुठल्याही हालचाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे गृहविभागाने याकडे लक्ष देत तत्काळ रिक्त पदे भरण्याची गरज आहे.

Web Title: Jail capacity 252, actual inmates over five hundred; Three 'international' prisoners came in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.