जनधन खात्याने वाढविली डोकेदुखी

By Admin | Published: April 23, 2017 02:13 AM2017-04-23T02:13:00+5:302017-04-23T02:13:00+5:30

केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन होताच जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाने बँकेत खाते उघडावे,

Janananatha department raised headache | जनधन खात्याने वाढविली डोकेदुखी

जनधन खात्याने वाढविली डोकेदुखी

googlenewsNext

नागरिकांची अडचण : मिळतात केवळ १० हजार
वर्धा : केंद्र व राज्यात सत्ता परिवर्तन होताच जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाने बँकेत खाते उघडावे, असा प्रचार-प्रसार केला. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांनी बँकखातेही उघडले. परंतु, जनधन खाते धारकांना महिन्याचे केवळ दहा हजार रुपयेच बँक खात्यातून काढता येत असल्याचे बँक कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूणच जनधन खाते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
नोटाबंदीच्या निर्णया पुर्वी तसेच सदर निर्णयानंतर जिल्ह्यातील अनेकांनी विविध बँकांमध्ये खाते उघडले आहेत. अनेकांचे वेतन त्यांच्या याच बँक खात्यात प्रत्येक महिन्याला जमाही होते. परंतु, बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या अनेकांना बँक कर्मचाऱ्यांकरवी तुमचे खाते जनधन खाते आहे, त्यामुळे तुम्हाला महिन्याचे केवळ १० हजार रुपयेच आम्हाला देता येते असे सांगितले जात आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस असून जिल्ह्यातील अनेक एटीएम कक्षांमध्ये रोकड नाही. कॅशलेस एटीएमची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याने रोकड असलेल्या एटीएमच्या शोधार्थ नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. त्यातही बँकखात्यात मुबलक रक्कम असतानाही केवळ दहा हजाराचाच विड्रॉल दिल्या जात असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यातील शेतमजुर, शेतकरी, तसेच होतकरू तरुण-तरुणींसह नागरिकांची समस्या लक्षात घेता सदर प्रकाराकडे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत सदर समस्या निकाली काढण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)

जनधन बँक खाते बचत खात्यात तसेच इतर बँक खात्यात वळते करता येते. तसे करता येणे शक्य होत नसल्यास ते खाते बंद करून दुसरे बँक खाते उघडता येते.
. - वामन कोहाड, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक वर्धा.
 

Web Title: Janananatha department raised headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.