स्वातंत्र्य चळवळीमध्ये जंगल सत्याग्रहाची मोलाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:09 PM2018-08-19T22:09:08+5:302018-08-19T22:10:10+5:30
इतिहासात तळेगावची नोंद भोसलेकालीन शामजीपंत महाराजाचे मंदिर, बाहुली व सत्याग्रही घाट अशी आहे. हा इतिहास ८७ वर्षापासून काळाच्या पडद्याआड दडलेला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये तळेगावची भूमिका महत्वाची होती, असे प्रतिपादन आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : इतिहासात तळेगावची नोंद भोसलेकालीन शामजीपंत महाराजाचे मंदिर, बाहुली व सत्याग्रही घाट अशी आहे. हा इतिहास ८७ वर्षापासून काळाच्या पडद्याआड दडलेला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये तळेगावची भूमिका महत्वाची होती, असे प्रतिपादन आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी केले.
सत्याग्रही घाटातील गारगोटीच्या माथ्यावर आमदार डॉ. आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन १९३० जंगल सत्याग्रहामध्ये सहभागी असलेल्या ३० हजार स्वातंत्र्य सेनानींना शेकडो नागरीकासह आदरांजली वाहली यावेळी ते बोलत होते. ग्रामपंचायत तळेगावच्यावतीने तिरंगा एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात राष्ट्रसंत चौकातून करण्यात आली. त्यात शेकडो नागरिकांनी सहभागी झाले. सन १९३० च्या जंगल सत्याग्रह दत्तगड ध्वजारोहण भूमीत माजी सैनिक विजय इंगळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सन १९३० च्या जंगल सत्याग्रहाची भूमिका मोलाची होती. विदर्भातील लोकांनी जंगल सत्याग्रहाच्या माध्यमातून एक नैतिक विजय प्राप्त केला.१ आॅगस्ट १९३० रोजी तळेगाव येथील दतगडावर ३० हजार स्वयंसेवक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक गणपतराव टिकेकर व श्रीधरराव दाते यांच्या नेतृत्वात तळेगाव पंचक्रोशीतील शेतकरी शेतमजूर गोळा झाली. तेथून चार-चारचे शेकडो गट तयार करून गारगोटीच्या माथ्यावर एका मागवून एक शिस्तबध्द शांतमय असे जात होते. स्वयंसेवकाच्या नेत्रदीपक कार्यामुळे इंग्रजांचे सनदी नोकर भारावून गेले, असे आ. आंबटकर म्हणाले. रॅलीचा समारोप माजी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थित झाला. यावेळी अधिकारी वन परिक्षेत्र तळेगावचे पाटील,जि.प. सदस्य अंकिता होले, हेमलता भगत, वाहिद पठाण, मनिषा गाडगे, सुनील मोहेकर, नंदू जाधव, प्रशांत कडू, अंकुश नरंगे, राहुल गाडापेले, प्रफुल डहाके, ग्रा.प. सदस्य, सत्याग्रह शेतकरी संघ सदस्य मुकुंद ठाकरे, सचिन होले, नवाज पठाण, दतात्रय पुसदेकर, त्रिशूल भुयार, राहुल बुले, प्रकाश राऊत, सोनिसिंग टाक आदी उपस्थित होते.