बेटी बचाओ अभियानातून सामाजिक समस्यांचा जागर
By admin | Published: July 8, 2015 02:18 AM2015-07-08T02:18:05+5:302015-07-08T02:18:05+5:30
लॉयन्स क्लब, वर्धा आणि वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यावतीने बेटी बचाओ अभियान सुरू करण्यात आले.
वर्धा : लॉयन्स क्लब, वर्धा आणि वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यावतीने बेटी बचाओ अभियान सुरू करण्यात आले. या उपक्रमातून विविध सामाजिक समस्यांचा जागर करण्यात येत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. विनोद अदलखिया, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरूण पावडे, अभिषेक बेद, अनुराग पोद्दार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजात महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी याकरिता या अभियानातून जागृती करण्यात येत आहे. हे अभियान जन आंदोलन व्हावे, असे मत डॉ. राठोड यांनी यावेळी व्यक्त केले. ‘‘चला सर्व जण मिळून मुलींच्या जन्माचे स्वागत करूया, मुलींना शिकवा तरच देशाची प्रगती होईल.’’ असा संदेश समाजात देण्यात येत आहे. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. अलोक विश्वास, डॉ. प्रदीप मुळे, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. शांतनु चौहान, लॉयनेस क्लबच्या आस्था बेद, योगिता मानकर, विजया अड्याळकर, अभिजीत श्रावणे, रंजना दाते, सोनाली श्रावणे, स्मिता बढीये, पुष्पा मोहोड, सुमित झाडे, विशाल मरडवार, पंकज डाफे आदींचा सहभाग आहे. कार्यक्रमाला डॉ. रश्मी गोडे, डॉ. अजय वाणे, डॉ. माधुरी वाणे यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)