जेष्ठ गांधीवादी, सर्वोदयी व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 01:04 PM2022-03-15T13:04:48+5:302022-03-15T13:05:11+5:30

गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष,सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे.

Jaywant Mathkar, senior Gandhian, Sarvodayi and former president of Sevagram Ashram passed away | जेष्ठ गांधीवादी, सर्वोदयी व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे निधन

जेष्ठ गांधीवादी, सर्वोदयी व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे निधन

Next

सेवाग्राम (वर्धा) :    गांधी विनोबा जयप्रकाश  यांच्या विचारांचे पाईक असलेले सर्वोदयी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भारतभर सतत कार्यरत असणारे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष जयवंत गंगाराम मठकर यांचे पुण्यात सोमवारला निधन झाले.ते ८५  वर्षाचे होते.ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते.

    गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष,सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे.जयवंत मठकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मठ या गावचे.त्यांचा जीवन प्रवास हा खडतर असाच राहिला आहे.मठकर यांचा परिचय सर्वोदय जगतात "काका"म्हणूनच सदैव राहिला आहे.त्यांच्या विचार व कार्यांची छाप नी प्रत्यक्ष अनुभव सेवाग्राम सह वर्धा येथील अनेक संस्था नी लोकांनी अनुभवला आहे.माणसे जोडणे,कार्यक्रम,युवकांना सक्रीय करणे, जबाबदारी देणे यामधून ते सर्वांमध्ये लोकप्रिय बणले होते.

      त्यांच्या पाच वर्षांचा काळ हा आश्रम वासियांसाठी तसेच सेवाग्राम वासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा नी स्मरणीय असाच राहिला आहे.कापूस ते कापड हा उपक्रम सुरू केला.यातून आश्रमातच खादीला चालणा दिली.पर्यटकही सूतकताई व विनाई पाहून गांधीजींच्या काळातील खादी चे काम प्रत्यक्ष पाहता येऊ लागले.सेवाग्राम येथील दारूबंदी महिलांना सक्रीय करणे,सर्वोपरी मदत करीत असल्याने दारूविक्रेत्यांवर नियंत्रण आले होते.महिला सुध्दा जोमाने सक्रीय झाल्या होत्या.मठकर यांच्या पुढाकारातून माजी खासदार ,उद्योगपती राहूल बजाज यांनी फंड सुध्दा दिला होता.सर्वोदय समाज संमेलन घेण्यात त्यांचा विशेष पुढाकार होता.गांधीजींचे नातू प्रा.जगमोहन गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एड.प्रकाश आंबेडकर यांना एकाच विचार पिठावर आश्रमात आणून गांधी आंबेडकर वाद हा कधीच नव्हता तर ती वैचारिक लढाई होती हे त्यांनी दाखवून दिले.

      सेवाग्राम आश्रमातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध प्रेमवत आणि पारिवारिक असाच राहिला आहे.कार्यकर्त्यांना नेहमीच ते मान सन्मान देत असे.आस्थेने चौकशी करीत असे.त्यामुळे जयवंत मठकर यांची आठवण आजही केल्या जात असून त्यांचा कार्यकाळ खुप चांगला होता असे कार्यकर्ते म्हणतात.त्यांच्या निधनाने एक सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुली,जावाई,एक मुलगा,सून, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.पुण्यात मंगळवारला सकाळी अंतसंस्कार पार पडला.

Web Title: Jaywant Mathkar, senior Gandhian, Sarvodayi and former president of Sevagram Ashram passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.