जिनिंगला आग; दोन हजार गाठी भस्मसात
By admin | Published: March 16, 2017 12:39 AM2017-03-16T00:39:31+5:302017-03-16T00:39:31+5:30
पुलगाव मार्गावर असलेल्या गणेश नॅशनल फायबर या जिनिंगला लागलेल्या आगीत दोन हजार गाठी व सहा हजार क्विंटल जळून खाक झाला.
पाच कोटींच्या नुकसानीचा अंदाज : ६ हजार क्विंटल कापूसही जळाला
आर्वी : पुलगाव मार्गावर असलेल्या गणेश नॅशनल फायबर या जिनिंगला लागलेल्या आगीत दोन हजार गाठी व सहा हजार क्विंटल जळून खाक झाला. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. तीन अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
आर्वी-पुलगाव मार्गावर दिलीप अग्रवाल रा. आर्वी यांचे गणेश नॅशनल फायबर ही जिनिंग कंपनी आहे. या कंपनीमध्ये बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पुलगाव, वर्धा आणि हिंगणघाट येथील अग्निशामक दलाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत सुमारे दोन हजार गाठी आणि सहा हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. यात सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. शॉट सर्किटमुळे ही आग लागली व पहाटेची वेळ असल्याने उशिरा लक्षात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)