१५०० किमी प्रवास करणारी सायकल यात्रा वर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:40 PM2018-02-28T23:40:46+5:302018-02-28T23:40:46+5:30
महाराष्ट्र पोलीस व वायूदल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथून काढण्यात आलेली ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा बुधवारी वर्धेत दाखल झाली.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : महाराष्ट्र पोलीस व वायूदल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथून काढण्यात आलेली ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा बुधवारी वर्धेत दाखल झाली. या सायकल यात्रेत वायू व पोलीस दलाचे २० जवान सहभागी झाले आहे. हे जवान नाशिक - नागपूर व नागपूर - नाशिक, असा १,५०० किमीचे अंतर अवघ्या दहा दिवसांत पूर्ण करणार आहेत.
या सायकल यात्रेत नाशिक वायूदलाचे दहा जवान तर नाशिक पोलीसचे दहा जवान सहभागी झाले आहेत. २२ फेब्रुवारीला नाशिक येथून निघालेल्या या सायकल यात्रेने धुळे, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर असा प्रवास करीत बुधवारी वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सर्व सायकलीस्टशी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी संवाद साधला. त्यानंतर पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी या सायकलीस्टचा उत्साह वाढविण्यासाठी स्वत: पोलीस अधीक्षक कार्यालय ते वर्धा शहर पोलीस ठाण्यापर्यंत यात्रेत सहभागी होऊन सायकल चालविली. शिवाय या सायकल यात्रेत प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) पराग पोटे, आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मौराळे, वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले आदींनी सहभागी होऊन ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश दिला. नाशिक येथून निघालेल्या या सायकल यात्रेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गिरमे, नंदू उगले, बाळकृष्ण वेताळ, सुदाम सांगळे, दिनेश माळी, किरण वडजे, संदीप भुदे, हर्षल बोरसे, एम.के. धुम, फुलचंद पवार, देवळाली नाशिक वायुदलाचे संतोष दुबे, सुमित, नितीन पाटील, संजय, एस.ए. जाधव, रवींद्र, धीरज, मनजीत आदी सहभागी झाले. शहर ठाण्याच्या आवारात सायकलीस्टला निर्मलादेवी यांनी निरोप दिल्यानंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
एसपी, एसडीपीओ सायकलवर
एरवी वातानुकूलित कार अन् वातानुकूलित दालनात कामकाज करणाºया पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी नागरिकांना सायकल चालविण्याचे कायम फायदे आहेत, हे पटवून देण्यासाठी स्वत: सायकल चालविली. वर्धेतील या अधिकाºयांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून सायकलने शिवाजी चौक, सोशालिस्ट चौक असे मार्गक्रमण करीत वर्धा शहर पोलीस ठाणे गाठले. एसपीसह बडे पोलीस अधिकारी खुद्द सायकल चालवित असल्याने ही सायकल यात्रा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.