जांभुळ आरोग्यासाठी पोषकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:30 AM2018-07-22T00:30:16+5:302018-07-22T00:31:23+5:30
पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे. असा अभ्यासकांचा दावा आहे. विदर्भात विक्रीला येणारे जांभूळ हे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातून येतात. याची अनेकांना माहिती नाही. कोरची तालुक्यातील जांभुळे दर्जेदार आहेत. नागपूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यात ते विक्रीसाठी पाठविले जातात. व नागपूरवरून वर्धा, यवतमाळ आदी भागात ते पुरवठा केले जातात.
चार जातीच्या जांभळाचे होते उत्पन्न
कोकण बहाडोली, गोकाक जातीच्या तीन प्रजातीत जांभळाचे उत्पन्न होते. जांभुळ औषधी गुणधर्माची असून यांचा उत्पन्न निसर्गाच्या वातावरणात जंगलात होत असल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक मूलद्रव्य जात नाहीत. त्यामुळे या कोरचीच्या जांभुळाला विशेष महत्त्व आहे.
जांभुळ उपचार
जांभुळ फळापासून मधुमेह, अंथरून ओले करणे, रक्ती हगवण, जुलाब, दात आणि हिरड्या दुखी, जंत, घसा त्रास, मुळव्याध, ऊलटी, फुफ्फुस, मूतखडा, जखम, पांढरे जळालेले डाग, कीडा चावल्यावर आदी आजारांवर उपचार करता येतो.
या आजारांवर जांभुळ रामबाण औषध
जांभुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. रक्ताच्या शुद्धीकरणासाठी, पांडुरोग, कावीळ आदी विकारांवर जांभुळ उपयुक्त आहे.
जांभुळाची साल पाचक व जंतुनाशक असते. या सालीचा उकाळा करून प्यायला असता अतिसार व मुरड्यावर उपयोग होतो.
जांभुळामुळे पित्त कमी होते. उलटीवाटे पित्त निधून जाण्यासाठी जांभळाच्या ताज्या सालीचा रस दुधातून घ्यावा.
पित्तामुळे उलटी होत असल्यास जांभळाची दोन-तीन पाने पाण्यातून उकळून व गाळून घ्यावी. मधासोबत ते प्यायल्याने पित्तशमन होते.
पिकलेली जांभुळे खाल्ल्याने पित्तामुळे होणारे जुलाबही बंद होतात.
हातापायांची जळजळ होत असल्यास जांभळाचा रस लावावा, त्यामुळे रक्त थांबते.
जांभुळाची बी पाण्यात उगाळून घामोळ््यावर लावले असता घामोळे कमी होते.
जांभुळाच्या सालीची राख मधातून दिल्याने आंबट उलट्या होण्याचे थांबते.जांभळाच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या असता हिरड्यांची सूज कमी होते.
जांभुळ वृक्षाचा उपयोग
जांभुळ वृक्षाचे लाकुड मजबुत आणि पाणी रोधक आहे, कृषी अवजारे, बैलगाडी चाके, घरकाम आदीकरीता लाकडाचा उपयोग होतो. पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या ठिकाणी जसे डिझेलपंपाच्या खाली, विहिरीमध्ये पाट्या वापरतात, प्रक्रियायुक्त पदार्थ- जॅम, जेली, चिप्स, वाईन, विनेगार, स्क्वॅश, लोणचे आदी, रेल्वे गाड्यांमध्ये आसने तयार करण्याकरीता, इंधन आणि कोळसा निर्मितीकरीता, पानांच्या उपयोग दंतमंजन तयार करण्याकरीता, पशुखाद्याकरीता, टसर अळ््यांचे अन्न, तेलाचा उपयोग साबण आणि अत्तर करीता, औषधी निर्मितीकरीता, कापड उद्योगामध्ये रंगकाम आणि कातण्याकरीता जांभुळ मध्य-मधमाशी पालन यात वृक्षाचा उपयोग होतो.