महापुरूषांच्या विचारांमुळेच न्याय मिळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 09:45 PM2018-01-27T21:45:26+5:302018-01-27T21:45:46+5:30

फुले-शाहू- आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता ही बुद्धतत्वज्ञानातील मूल्ये अंगिकारून शोषणविरहीत समाजव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.

Justice gets justice because of the thoughts of the great men | महापुरूषांच्या विचारांमुळेच न्याय मिळतो

महापुरूषांच्या विचारांमुळेच न्याय मिळतो

Next
ठळक मुद्देसुरेश बोरकर : ‘भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमांची बदलती भूमिका’ यावर व्याख्यान

आॅनलाईन लोकमत
वर्धा : फुले-शाहू- आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता ही बुद्धतत्वज्ञानातील मूल्ये अंगिकारून शोषणविरहीत समाजव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्याच महामानवाचे विचार जर शासनकर्ते, प्रशासन, व्यवस्थापन, न्यायाधिश, भांडवलदार इत्यादींच्या डोक्यात असेल तर कोणत्याही अन्यायग्रस्त व्यक्ती किंवा समूह न्यायापासून वंचित राहणार नाही असे मत सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते तथा माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बोरकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर समविचारी संघटना यांच्या विद्यमाने अनेकांत स्वाध्याय मंदिरात आयोजित ४२ व्या अभ्यास वर्गात ‘भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमांची बदलती भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव गुल्हाणे, राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, संचालक अरूण चवडे, संस्थापक जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेकडे बघितले जाते. विचार, लेखन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करीत असताना आपल्या संविधानिक कर्तव्याचा विसर न पडता घडलेल्या घटनांची सत्यता जनतेसमोर येणे गरजेचे आहे. परंतु आज काही चॅनल्स सत्ताधिशांच्या भांडवलशाहीच्या दावणीला बांधून सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात हे कोरेगाव भिमाच्या घटनेवरून दिसून आले. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी जनतेचे रक्षक म्हणूनच भूमिका जपली पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. भास्कर नेवारे यांनी केले. प्रास्ताविक सुनील ढाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार अभिनव हिवंज यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अ‍ॅड. पूजा जाधव, किशोर जगताप, सुनील सावधे, भिमसेन गोटे, प्रा. दत्तानंद इंगोले, मिरा इंगोले, दिवाकर शंभरकर, रा.सु. भोपळे, पदमाकर पोथारे, विकास दांडगे, अनिव मुर्डीव सुधाकर मिसाळ, राजेंद्र ढोबळे आदींनी सहकार्य केले. नागरिकांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

Web Title: Justice gets justice because of the thoughts of the great men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.