ज्योतिबा फुले हे मराठी रंगभूमीचे जनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:43 PM2018-04-16T23:43:05+5:302018-04-16T23:43:05+5:30

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हेच मराठी रंगभूमीचे जनक असून त्यांचे तृतीयरत्न हेच नाटक पहिले मराठी नाटक आहे.

Jyotiba Phule is the father of Marathi theater | ज्योतिबा फुले हे मराठी रंगभूमीचे जनक

ज्योतिबा फुले हे मराठी रंगभूमीचे जनक

Next
ठळक मुद्देसतीश पावडे : इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशनचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हेच मराठी रंगभूमीचे जनक असून त्यांचे तृतीयरत्न हेच नाटक पहिले मराठी नाटक आहे. असे प्रतिपादन हिंदी विश्वविद्यालयाच्या परफॉर्मिंग आॅफ आर्टचे विभाग प्रमुख डॉ. सतिश पावडे यांनी इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानारून नाट्य रसिकांना मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक प्रवीण पेठे, अ‍ॅड. अर्चना पेठे उपस्थित होते. कार्यक्रमाला नाट्य दिग्दर्शक राजू बावने, मेघा तुपकर, अजय भेंडे, गौतम पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. पावडे म्हणाले की, आज ही समाजात विष्णूदास भावेंचे संगीत सौभद्र हेच पहिले नाटक आहे असे बिंबविले जाते. पण बहुजन समाजाने यामागील भूमिका ओळखायला हवी आणि त्यामागील राजकारण मोडून काढायला हवे. तसे झाले तरच महात्मा फुले हेच मराठी रंगभूमिचे जनक असून त्यांचे तृतीयरत्न हेच नाटक आद्य मराठी नाटक आहे ही विचारधारा समाजात रूजेल. बहुजन समाजातील लोकांच्या श्रद्धाळू भावनांचा वापर करून आजही त्यांना लुटण्याची प्रवृत्ती आहे. तेव्हा या प्रवृत्तीपासून सजग राहिले पाहिजे आणि त्यासाठी महात्मा फुलेंची विचारधारा स्विकारून कार्य करणे आवश्यक आहे. समाजाशी बांधिलकी स्विकारून परिवर्तनाचे कार्य करण्यास कटीबद्ध असलेल्या या चळवळीचा पाया ही महात्मा फुलेंच्या परिवर्तनवादी विचारधारेतून घातला गेला आहे.
प्रास्ताविक ईप्टाचे अध्यक्ष राजू बावने यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सचिव डॉ. स्मिता वानखेडे यांनी तर आभार सहसचिव जयवंत भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संजय तिळले, सूर्यप्रकाश पांडे, चंद्रकांत तिळले, मनोज बावणे, अंकुश डांगे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Jyotiba Phule is the father of Marathi theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.