४० हजारांसाठी केली सुखरामची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:29 AM2019-03-09T00:29:19+5:302019-03-09T00:31:49+5:30

परडा पाटी जवळील तास रोडवर सुखराम गोडघाटे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात समुद्रपूर पोलिसांना यश आले असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या ४० हजारांसाठी सुखरामची हत्या करण्यात आल्याचे तसेच मृतकानेच वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती.......

Kala Sukhram murder for 40 thousand | ४० हजारांसाठी केली सुखरामची हत्या

४० हजारांसाठी केली सुखरामची हत्या

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : मृतानेच दिली होती वडिलांना मारण्याची सुपारी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : परडा पाटी जवळील तास रोडवर सुखराम गोडघाटे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात समुद्रपूर पोलिसांना यश आले असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या ४० हजारांसाठी सुखरामची हत्या करण्यात आल्याचे तसेच मृतकानेच वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. सुनील जगदीश ठक (३२) रा. आरंभा व हनुमान महादेव झाडे (४५) रा. भद्रावती असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सुखराम गोडघाटे व वडील शालिक गोडघाटे यांचा जानेवारी १९ मध्ये शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून पोलीस कचेरीत तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. तेव्हापासून सुखराम चिडून सुनील ठक याला १० हजारात वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती; पण आरोपींनी त्यांना मारले नाही. ६ मार्चला हिंगणघाटच्या सराफा व्यावसायिकाला शेती विकण्यासाठी सुखराम हा आरोपी सुनील ठक याच्यासोबत दुचाकीने गेला होता. तेथे शेतीचे इसार पत्र करुन त्याचेकडून ४० हजार इसार घेवून दोघेही नंदोरी येथे आले. तेथे दारू पिऊन ते भद्रावतीकडे दुचाकीने रवाना झाले. भद्रावती येथे सुनीलने आपला जावाई हनुमान झाडे याला बोलविले. तिघेही तेथे दारू पिऊन वरोरा येथे जेवण करून गावाला परत आले. या काळात सुखरामला दारू पाजून त्याचे जवळील पैसे काढण्याचा बेत होता. मात्र, ते पैसे सुनीलने काढले नाही. जेव्हा तिघेही आरंभा येथे आले तेव्हा सुखरामला घराजवळ सोडून सुनील व हनुमान उभे असताना हनुमानने सुनीलला विचारले की पैसे काढले का, तेव्हा नाही म्हटले. तेव्हा हनुमान याने मी भद्रावती वरुन पैशासाठी आलो. तेव्हा पुन्हा सुखरामला फोन करुन दारू प्यायचे आहे, असे सांगुन बोलाविले. त्यानंतर सुनीलने दुचाकी चालविण्यापूर्वी मृतकाला मधात बसवून मागे हनुमानला बसचिले. परडा पाटीकडे गाडी आणून तास रोडवर हनुमानने सुखरामचा गळा दुपट्ट्याने आवळला. दरम्यान तिघेही दुचाकी वरुन पडले. त्यानंतर सुखराम जवळील ३६ हजार रुपये घेवून आरोपींनी पोबारा केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी ३१ हजार रुपये जप्त करून त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास ठाणेदार मुडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मिलिंद पारडकर, रवी वर्मा, धर्मेंद्र तोमर, अरविंद येणूरकर आदी करीत आहेत.

Web Title: Kala Sukhram murder for 40 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.