अल्लीपुरात कापसाला मिळाला ४ हजार २२१ रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:19 AM2017-10-29T01:19:52+5:302017-10-29T01:20:33+5:30
येथील श्री गुरुदेव कॉटन इंडस्ट्रीजमध्ये शनिवारी कापूस खरेदीला शुभारंभ करण्यात आला. यावेळी ४ हजार २२१ रुपये भाव कापसाला देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर/वर्धा : येथील श्री गुरुदेव कॉटन इंडस्ट्रीजमध्ये शनिवारी कापूस खरेदीला शुभारंभ करण्यात आला. यावेळी ४ हजार २२१ रुपये भाव कापसाला देण्यात आला. याप्रसंगी सरंपच मंदा पारसडे, पं. स. सदस्य प्रशांत चंदनखेडे यांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी खासगी व्यापाºयांची कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र, शासनाची कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आपला कापूस गावातील स्थानिक व्यापाºयांलाच विकत आहे. राज्य सरकारने सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कापूस पणन महा संघाचे काही खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार होते. परंतु, अद्याप खरेदी केंद्र सुरू झालेले नाही तर बºयाच ठिकाणी चुकारे उशीरा मिळत असल्याने शेतकरी शासनाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत आहे. राज्य सरकार सोयाबीन खरेदी बाबत आॅनलाईन प्रक्रिया राबवित असून अनेक शेतकºयांना आॅन लाईन नोंदणी करताना अडचणी येत आहे. शेतीचे काम सोडून नोंदणीसाठी जावे लागत आहे. त्यामुळे सोयाबीनची ही तूर खरेदी सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.