जिल्हाधिकाºयांच्या पत्राला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:48 AM2017-09-30T00:48:45+5:302017-09-30T00:52:08+5:30

शेतात मलमुत्राचे पाणी येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली होती. या तक्रारीवर चौकशी करण्याच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासनाला दिल्या होत्या.

 Karaachi basket in the letter of District Collector | जिल्हाधिकाºयांच्या पत्राला केराची टोपली

जिल्हाधिकाºयांच्या पत्राला केराची टोपली

Next
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत: शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शेतात मलमुत्राचे पाणी येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली होती. या तक्रारीवर चौकशी करण्याच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र या दोन्ही प्रशासनाकडून जिल्हाधिकाºयांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली.
शेतकरी गिरीश संगीतराव यांनी १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकाºयांकडे महाराष्ट्र अधिनियम ५३ (२अ) अंतर्गत अर्ज केला. या अर्जानुसार, संगितराव यांच्या शेताच्या कडेला मलातपूर हे गाव आहे. गाव व शेताच्या मध्ये ग्राम पंचायत हिवरा(का)चा रस्ता आहे. गावातील सरपंच अशोक डफरे व माजी पोलीस पाटील यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करीत गावातील रस्त्यात संडास, बैलगोठा बांधुन पाणी संगितराव यांच्या शेतात काठले. गावातील काही लोकांनी रस्त्याच्या मध्ये इंधन, काडी व उकीरडे टाकून रस्ता तार तोडण्याचा प्रयत्न करत आहे. संगितराव यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना अर्जद्वारे माहिती देवून कार्यवाही करण्यास सांगितले. पण स्वत: सरपंच यांनी अतिक्रमण केले असल्यामुळे त्यांनी कुठलेही कार्यवाही केली नाही. यावर सदर शेतकºयाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत कारवाईची मागणी केली. यावर जिल्हाधिकाºयांनी पऋ दिले मात्र कारवाई झाली नाही.

आलेले पत्र पडूनच
संगितराव यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयातून चौकशीचे आदेश पत्र १८ मे २०१७ रोजी जि.प. व पं.स. यांना पाठविले. हे पत्र त्यांना मिळाले पण अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात जि.प. प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

या वादग्रस्त जागेच्या मोजणीबाबत तहसीलदार देवळी यांना कळविण्यात आले आहे. मी नुकताच रुजू झाल्यामुळे पंचायत विस्तार अधिकारी ही बाब हाताळत आहे. ग्रा.प. निवडणूकीनंतर या तक्रारीचे निवारण होईल.
- मनोहर बारापात्रे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, देवळी

Web Title:  Karaachi basket in the letter of District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.