कराटे हा खेळ विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:25 PM2018-10-20T22:25:39+5:302018-10-20T22:26:00+5:30
आजच्या काळात कराटे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. वाढती गुन्हेगारी, अत्याचार वाढत चालला आहे. माणसाला स्वत:चे रक्षण करता येणे आवश्यक झाले असून कराटेमुळे ते शक्य आहे व मुलांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची स्तुती करत आर्या असोसिएशन विद्यार्थ्यांना घडविण्याचे चांगले कार्य करत आहे, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजच्या काळात कराटे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. वाढती गुन्हेगारी, अत्याचार वाढत चालला आहे. माणसाला स्वत:चे रक्षण करता येणे आवश्यक झाले असून कराटेमुळे ते शक्य आहे व मुलांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची स्तुती करत आर्या असोसिएशन विद्यार्थ्यांना घडविण्याचे चांगले कार्य करत आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी केले. विकास विद्यालय, गांधी नगर येथे आर्या मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भगत यांनी बेल्ट प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा आणि प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख राजू सराफ होते. वर्धा शहराचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी मुलं कराटेच्या माध्यमातून अन्यायाला आळा घालू शकतात व इतरांचे सुद्धा रक्षण करू शकतात, असे सांगितले. कार्यक्रमात ६९ विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. आर्या असोसिएशनचे वर्धा जिल्ह्यातील शाखा प्रशिक्षक अमिता काळे, भारत राठोड, कौशल साळवे, सूरज राजपूत, मयुरी भोंडे यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले व सेन्साई रिना कावडे यांना चांगल्या कार्याबद्दल विशेष सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले.
कार्यक्रमात दक्ष फाऊंडेशन अध्यक्ष प्रकाश खंडार, मित्सुया काई कराटे डो इंडियाचे अध्यक्ष सिहान झाकीर एस. खान, शिवसेना उपाध्यक्ष किशोर बोकडे, दीपक चुटे, नरेश पेटकर, डॉ. विद्या कळसाईत, रामेश्वर लांडे, वर्षा कांबळे, गायत्री रोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रिना कावडे, आभार अनिता काळे यांनी मानले.