कस्तुरबा महिलाच नव्हे तर पुरूषांसाठी आदर्श आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:15 PM2018-02-22T22:15:39+5:302018-02-22T22:16:01+5:30

कस्तुरबा मनाने खंबीर व विचारावर कायम राहणाऱ्या असल्याने निर्धार हा गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या मते आपली बांधिलकी विश्वमानवते प्रती असली पाहिजे. मनात भीती प्रलोभनामुळे निर्माण होते.

 Kasturba is not only a woman but also an ideal for men | कस्तुरबा महिलाच नव्हे तर पुरूषांसाठी आदर्श आहेत

कस्तुरबा महिलाच नव्हे तर पुरूषांसाठी आदर्श आहेत

Next
ठळक मुद्देराधाबहन भट : महात्मा गांधी आश्रमात कस्तुरबा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

ऑनलाईन लोकमत
सेवाग्राम : कस्तुरबा मनाने खंबीर व विचारावर कायम राहणाऱ्या असल्याने निर्धार हा गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या मते आपली बांधिलकी विश्वमानवते प्रती असली पाहिजे. मनात भीती प्रलोभनामुळे निर्माण होते. आताचा समाज संकुचित झाला आहे. मनाची प्रगल्भता वाढविणे गरजेचे झाले आहे. बा या महिलाच नव्हे तर पुरूषांसाठीही आदर्शवतच आहेत, असे मत लक्ष्मी आश्रम कौसाजीच्या राधाबहन भट यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम आश्रम परिसरात सभास्थळी गुरूवारी कस्तुरबांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही तर प्रमुख वक्ता म्हणून राधाबहन भट, उषा बहन, नीता विद्रोही, उषा पंडित उपस्थित होत्या. उपस्थितांनी बा च्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण करून अभिवादन केले.
राधाबहन पूढे म्हणाल्या की, बापू बा मध्ये सामावलेले होते. दोघेही एकमेकांत सामावले असले तरी कस्तुरबांचे स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्व होते, हे विसरता येत नाही. बा एकदा आजारी पडल्या. त्यांनी दूध न घेण्याचे ठरविले; पण डॉक्टर व गांधीजींनी दूध घेण्याचा आग्रह केला. त्यांनी मात्र दूध घेतले नाही. यावरून कस्तुरबांचा व्रत पालनाचा निर्धार दिसून येतो.
उषा बहन यांनी आज कस्तुरबाजींची पुण्यतिथी असून बा च्या निधनानंतर गांधीजींनी कस्तुरबा ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टचा उद्देश महिला, मुली व मुलांना सक्षम बनविणे आहे. पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान दिले आहे, असे सांगितले. कस्तुरबा माझी सहधर्मिनी, सहकारी व गुरू असल्याचे गांधीजींनी म्हटले. एकदा सरोजिनी नायडू यांनी बापूंना विचारले, जगातील सुंदर स्त्री कोण. त्यांनी लगेच उत्तर दिले ‘कस्तुरबा’. ही बाब नायडूंनी बाला सांगितली. त्या म्हणाल्या खरे आहे. बापू खोटे कधीच बोलत नाही, अशी उदाहरणे व माहिती पंडित यांनी देऊन त्यांचे महत्त्व सांगितले. महादेव विद्रोही यांनी दोन प्रसंग सांगून महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जीवनात व्रत व नियमांचे किती महत्त्व होते, हे पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन आशा ब्रोथ्रा यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश पंकज यांनी मानले.
घंटा घर ते बापू कुटी प्रभात फेरी
कस्तुरबा गांधी यांच्या ७४ व्या पुण्यतिथी निमित्त घंटा घर ते बापू कुटी अशी रामधून गान, प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर प्रार्थना झाली. प्रार्थना भूमिवर सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत सुत्रयज्ञ झाले. रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत बापूकुटीमध्ये सर्वधर्म भजने झालीत. या कार्यक्रमात जयवंत मठकर, डॉ. श्रीराम जाधव, ठाकूर, प्रसाद, राधाबहन भट तथा आश्रमातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title:  Kasturba is not only a woman but also an ideal for men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.