काटोलची धनश्री वाटकर ‘स्वरांजली’ची मानकरी

By Admin | Published: January 7, 2017 01:00 AM2017-01-07T01:00:00+5:302017-01-07T01:00:00+5:30

विद्या विकास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने १८ वी विदर्भस्तरीय

Katol's Dhanreesh Vatkar honors 'Swaranjali' | काटोलची धनश्री वाटकर ‘स्वरांजली’ची मानकरी

काटोलची धनश्री वाटकर ‘स्वरांजली’ची मानकरी

googlenewsNext

विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धा : प्रवीण पेटकर ठरला उपविजेता
समुद्रपूर : विद्या विकास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने १८ वी विदर्भस्तरीय ‘स्वरांजली’ गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. बुधवारी या स्पर्धेची अंतिम फेरी रंगली. यात काटोलची धनश्री वाटकर ही विजेता ठरली. प्रवीण पेटकर, शिरूर व गजानन वानखेडे, मदनी हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. सदर स्पर्धेत विदर्भातील नामवंत ९५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष पांडुरंग तुळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष शिला सोनारे, ठाणेदार प्रवीण मुंडे, प्रा. डॉ. उमेश तुळसकर, प्राचार्य रमेश बोभाटे, भूपेंद्र शहाणे, उपप्राचार्य डॉ. राजविलास कारमोरे, श्याम अलोणे, प्रा. किरण वैद्य, प्रा. विलास बैलमारे, मनीषा गांधी यांची उपस्थिती होती.
स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची यावेळी निवड फेरी घेण्यात आली. पहिल्या फेरीतून अंतिम फेरीकरिता १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत गायकांची सुश्राव्य गीत सादर केले. उयात धनश्री वाटकर हिने बाजी मारली. तिला डॉ. सुधीर खेडुलकर स्मृतप्रित्यर्थ रोख पुरस्कार प्रदान केला. तर प्रवीण पेटकर आणि गजानन वानखेडे यांना रोख बक्षीस देण्यात आले. यासह चतुर्थ स्थान प्रिया आत्राम, चंद्रपूर, पाचवे स्थान प्रकाश वाळके यांनी मिळेले. यासर्व विजेत्यांना रोख व गौरवचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच स्पर्धकांना प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मानित केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. प्रमुख अतिथी म्हणून किशोर दिघे, गजू देशमुख, डॉ. निलेश तुळसकर, व्यवस्थापक प्रशांत याचम, शांतीलाल गांधी, धनराज गोल्हर, भारत सामतानी, प्रकाश भोले, सुषमा खेडुलकर, गणेश महाकाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मेघश्याम ढाकरे यांनी केले. संचालन प्रा. मनोज कोरेकर, डॉ. नितीन आखुज, प्रा. दांडेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. राजकुमार रामटेके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरित डॉ. राजीव कळसकर, प्रा. चंद्रकांत सातपुते, डॉ. संजीव कटारे, प्रा. दशरथ महाकाळे, प्रा. अनिल तरोडकर, डॉ. विणा मेंढुले, नितीन डगवार, प्रा. अजय मोहोड, प्रा. फारीश अली, डॉ. अर्चना भेंडे, प्रफुल क्षीरसागर, अशोक झाडे, शोभा बागडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील गणमान्य नागरिक व रसिकांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Katol's Dhanreesh Vatkar honors 'Swaranjali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.