कामगारांना नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By admin | Published: July 16, 2015 12:03 AM2015-07-16T00:03:37+5:302015-07-16T00:03:37+5:30
कामगारांना नियमित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे आंदोलन
वर्धा : c या मागण्यांसाठी तसेच कामगारांना नियमित सेवेत घेण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन च्या कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचारी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
या आधीही प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहे. त्यावेळी सुरक्षा रक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही असे सांगण्यात आले होते. सोबतच रक्षकांना नियमित सेवेत घेणार असल्याचेही सांगण्यात आले. परंतु संबंधित कार्यालयीन विभागाने सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करून सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत होत असलेली जुन्या सुरक्षा रक्षकांची भर्ती ही माजी सैनिक महामंडळामार्फत मॅस्को कंपनीच्या अंतर्गत घेण्याचे ठरविले आहे. परंतु सदर कंपनीने जुन्या सुरक्षा रक्षकांना डावलून आपल्या कंपनीचे सुरक्षा रक्षक भरती केले आहे. मॅस्को कंपनी ही माजी सैनिकांपर्र्यंतच मर्यादित आहे. माजी सैनिक सुरक्षा रक्षक हे अपुऱ्या संख्येने असल्याने त्यांचा तुडवडा होमगार्डच्या मदतीने पूर्ण केला जात आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील महापारेषण कंपनीमधील ५३ ते ६० सुरक्षाकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
महापारेषण मध्ये ८ ते १० वर्षापासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मॅस्को कंपनीमार्फत घेण्याचे निर्देश द्यावे, किंवा माथाडी मंडळ बोर्डामार्फत भरती करून घेण्याचे निर्देश देऊन त्यांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे देण्यात आले. आंदोलनाला दिलीप उटाणे, साहेबराव मून, सुरेश गोसावी एस.एस. मोहदुरे आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)