माणुसकी ठेवून लोकाभिमुख काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:08 AM2019-03-03T00:08:24+5:302019-03-03T00:09:11+5:30
प्रशासनात काम करताना प्रत्येक फाईलमागे एखाद्या गरजू व्यक्तीचे काम आहे, ही माणुसकी जपून लोकाभिमुख काम करावे. शासकीय कामाचा चेहरा हा सामान्य माणूस असावा, असे प्रतिपादन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रशासनात काम करताना प्रत्येक फाईलमागे एखाद्या गरजू व्यक्तीचे काम आहे, ही माणुसकी जपून लोकाभिमुख काम करावे. शासकीय कामाचा चेहरा हा सामान्य माणूस असावा, असे प्रतिपादन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांना विकास भवनात निरोप देण्यात आला. निरोप समारंभाला उत्तर देताना नवाल बोलत होते. यावेळी वर्ध्याचे नवीन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, नवाल, शैलेश नवाल यांच्या मातोश्री, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनुज जिंदाल उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याची टीम अतिशय चांगली आहे. सर्वांच्या सहकायार्मुळे चांगली कामगिरी करता आली. सेनापतीच्या चांगल्या कामाचे श्रेय जोश आणि उत्साह असणाऱ्या सेनेला आहे, असे ते म्हणाले. संपर्कात येणाºया वर्धेतील प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकायला मिळाले. माझ्या व्यक्तिमत्त्व विकासात तुम्हा सर्वांचा वाटा आहे. असे नवाल यावेळी म्हणाले. कामाचा ताण सर्व कर्मचाऱ्यांनी वाटून घेतल्यामुळे कुटुंबासाठी पण चांगला वेळ देता आला, असेही त्यांनी नमूद केले. आपणा सर्वांकडून झालेले कौतुक पाहून दरवर्षी बदली व्हावी, अशी गमतीशीर प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार म्हणाले, शैलेश नवाल यांनी चांगली टीम तयार केली आहे. कमी मनुष्यबळामध्ये त्यांनी जिल्ह्याला सर्व योजनांच्या अंमलबजावणीत अग्रेसर ठेवले. त्यांनी केलेली कर्मचाºयांची क्षमता वृद्धी मला निश्चितच उपयुक्त ठरेल. यापुढेही वर्धा जिल्ह्य सर्व बाबतीत पुढे राहील असे काम सर्व मिळून करू या. प्रशासकीय सेवा दिलेला जिल्हा कायम प्रगती आणि विकास करतोय याचा आनंद आणि समाधान देण्याचा प्रयत्न आपण करूया असे भिमनवार यावेळी म्हणाले. कमी कर्मचारी आणि अधिकारी असतानाही जिल्ह्याने शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वेळी चांगली कामगिरी केली. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि कामासाठी त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारही मिळाला आहे असे मनोगत अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी व्यक्त केले. यावेळी चतुर्थ श्रेणी संघटनेच्या वतीने चंदू कावळे शिपाई, महसूल कर्मचारी संवर्ग, वाहनचालक संवर्ग, नायब तहसीलदार संवर्ग, तहसीलदार संवर्ग, उपजिल्हाधिकारी संवर्ग, यांच्या वतीने शैलेश नवाल यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या मातोश्रींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक कर्मचारी आणि अधिकाºयांंनी मनोगत व्यक्त केले.