हुतात्मा स्मारकाला झुडुपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:46 PM2017-10-09T23:46:31+5:302017-10-09T23:46:43+5:30
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहूती देणाºया हुतात्मा जंगलू धोंडबाजी ढोरे यांचे स्मारक स्थानिक सिव्हील लाईन भागात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहूती देणाºया हुतात्मा जंगलू धोंडबाजी ढोरे यांचे स्मारक स्थानिक सिव्हील लाईन भागात आहे. परंतु, दुर्लक्षीत कारभारामुळे सध्या या स्मारक परिसराला झुडूपाचा विळखा असल्याचे बघावयास मिळते. देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
वर्धेतील जंगलू धोंडबाजी ढोरे यांनी ११ आॅगस्ट १९४२ ला देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्याचे हे कार्य व इतर हुतात्म्यांचे कार्य नवीन पिढीला वेळोवेळी माहीत व्हावे या हेतूला केंद्रस्थानी ठेवून सिव्हील लाईन भागातील हुतात्मा स्मारकाचे गत काही वर्षांपूर्वी सौदर्यीकरण करण्यात आले. सौदयीकरणाच्या कामासाठी शासनाचा मोठा निधीही खर्च करण्यात आला. परंतु, सध्या सदर हुतात्मा स्मारकाकडे देखभालीची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. येथील सिव्हील लाईन भागात असलेल्या हुतात्मा स्मारकात सध्या मोठ्या प्रमाणात झुडूपे वाढली आहेत. त्यात सरपटणाºया प्राण्यांचाही वावर असल्याने अनुचित घटनेला निमंत्रण मिळत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
अनुचित घटनेला मिळतेय आमंत्रण
सिव्हील लाईन भागातील हुतात्मा स्मारक परिसरात लहान मुले आपल्या आई-वडील व घरातील वयोवृद्धांसह खेळण्यासाठी येतात. परंतु, सदर हुतात्मा स्मारक परिसरात ठिकठिकाणी झुडुपे वाढली आहेत. इतकेच नव्हे तर या झुडूपांमध्ये सरपटणाºया प्राण्यांचा वावर असल्याने व ते कापण्याकडे संबंधीतांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे.
परिसरात असते
काळोखाचे साम्राज्य
दुर्लक्षीत कारभारामुळे सिव्हील लाईन भागातील हुतात्मा स्मारकाची दैनावस्था झाली आहे. येथे ठिकठिकाणी झुडूपे वाढली असून ती कापण्याकडे दुर्लक्ष केली जात आहे. इतकेच नव्हे तर तेथे तीव्र प्रकाशाचे विद्युत पथदिवेही नाहीत. परिणामी, रात्रीच्या सुमारास या हुतात्मा स्मारक परिसरात काळोखाचे साम्राज्य असते.